काय सांगता? राज अन् उद्धव गुढीपाडव्याला एकत्र…

राज्यभरातील कार्यकर्ते राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे(political updates) यांना एकत्र आणण्यासाठी प्रयत्न करीत आहेत. याचसंदर्भात एक मोठी बातमी समोर आलीय. मुंबईत मराठी सेनेने गुढीपाडव्यानिमित्त एक मिलन कार्यक्रम आयोजित केलाय. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांना एकत्र आणण्यासाठी गुढीपाडव्यानिमित्त बंधू मिलन कार्यक्रम आयोजित केलाय.

मुंबईत हा कार्यक्रम 30 मार्च रोजी होणार असल्याची माहिती मिळतेय. या कार्यक्रमाचं निमंत्रण बाळासाहेब ठाकरे स्मृतीस्थळी ठेवण्यात आलंय. राज्यात लोकसभा आणि विधानसभा निवडणुका पार पडल्या आहेत. त्यानंतर आता सर्वत पक्ष महापालिका निवडणुकीच्या तयारीला लागले आहेत. तर सर्व मराठी लोकं ठाकरे बंधूंनी एकत्र यावं, अशी भावना व्यक्त करत आहेत. त्याअनुषंगाने कार्यकर्त्यांनी प्रयत्न देखील सुरू केले आहेत.

राज ठाकरे आणि शिवसेना उद्धव ठाकरे (political updates)पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी यासाठी म्हणून मुंबईतील मराठी सेना अॅक्शन मोडमध्ये आलीय. येत्या 30 तारखेला गुढीपाडव्याच्या निमित्ताने ठाकरे बंधू मिलन कार्यक्रम आयोजित करण्यात आलाय. हा कार्यक्रम मुंबईत होणार आहे. या कार्यक्रमाची निमंत्रण पत्रिका देखील खूप व्हायरल होतेय.

‘भाऊ माझा आधार, माझ्या ध्येयाचा किरॅनारा आयुष्याच्या प्रत्येक सुखदुःखाचा सोबती, भाऊ माझ्या जीवनाचा आधार’. बंधू मिलन कार्यक्रम दिनांक 30 मार्च 2025 रोजी छत्रपती शिवाजी महाराज मैदान मुंबई येथे सकाळी 11 वाजता स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृती स्थळाजवळ घेण्याचे योजिले आहे. मराठी माणसाच्या हितासाठी एकत्र येणं ही काळाची गरज आहे, तरी आपली उपस्थिती वंदनीय असेल, असं निमंत्रण पुत्रिकेमध्ये म्हटलंय.

Image (2)

या कार्यक्रमाचं आयोजन मोहनिश रविंद्र राऊळ यांनी केलंय. ते म्हणाले की, आज होळीचा सण आहे, आजच्या दिवशी सर्व काही विसरून पुन्हा ठाकरे बंधूंनी एकत्र यावं. कारण भावासाठी भाऊ धावून येतो. सध्या महाराष्ट्राला एका सक्षम नेतृत्वाची गरज आहे. या दोघांची गरज आहे. जर ठाकरे बंधू एकत्र आले तर, मराठी माणसाला बळ मिळेल.

हेही वाचा :

प्रेमसंबंधांना गावकऱ्यांचा विरोध, महिलेची प्रियकरासह रेल्वेखाली उडी

23 वर्षांची श्रीलीला 2 मुलांची आई; 11 वर्ष मोठ्या कार्तिक आर्यनसोबत रिलेशनशिपमध्ये?

रुग्णालयात काळी जादू? जमिनीखाली आढळले मानवी अवशेष असलेली आठ मडकी, तांदूळ, केस