राजू शेट्टींचं काय चुकलं? सदाभाऊ खोतांच उत्तर

 मतदारांनी आपल्याकडे पाठ फिरवल्याची खंत राजू शेट्टी यांनी(word express) व्यक्त करत ‘माझं काय चुकलं’अशी भावनिक प्रतिक्रिया दिली होती. त्यावरून आता रयत क्रांती संघटनेचे अध्यक्ष माजी मंत्री सदाभाऊ खोत यांनी शेट्टीना  डिवचले आहेहातकणंगले लोकसभा मतदारसंघात दारुण पराभव झाल्यानंतर स्वाभिमानी शेतकरी संघटना निराश झाली आहे. स्वाभिमानीचे नेते आणि माजी खासदार राजू शेट्टी यांनी निकालानंतर आपल्या तीव्र भावना व्यक्त केले आहेत.

सर्वसामान्यांचा आवाज घेऊन आपण जात असताना मतदारांनी(word express) आपल्याकडे पाठ फिरवल्याची खंत राजू शेट्टी यांनी व्यक्त करत ‘माझं काय चुकलं’ अशी भावनिक प्रतिक्रिया दिली होती. त्यावरून आता रयत क्रांती संघटनेचे अध्यक्ष माजी मंत्री सदाभाऊ खोत यांनी  शेट्टीना  डिवचले आहे. सदाभाऊ खोत यांच्याकडून एक पोस्ट व्हायरल करण्यात आली आहे. या पोस्ट मधून राजू शेट्टी यांचं काय चुकलं, यावर खोत दोन दिवसात आपली भूमिका मांडणार आहेत.

‘बरच काही राहून गेलं! पुलाखालून पाणी वाहून गेलं..’ मला ह्याच्यावर बोलायचं आहे. लवकरच स्वाभिमानाने लढलेल्या कार्यकर्त्यांना कळेल. अशी पोस्ट रयत क्रांती संघटनेचे नेते सदाभाऊ खोत यांच्याकडून समाज माध्यमावर व्हायरल करण्यात आली आहे. येत्या दोन दिवसात  स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांचे काय चुकलं यावर सदाभाऊ खोत हे भाष्य करणार आहे. आज मुंबईत माहितीतील घटक पक्षांची बैठक आहे. या बैठकीत सदाभाऊ खोत उपस्थित राहणार आहेत. त्यानंतर शनिवारी ते आपली भूमिका मांडणार आहेत.

गेल्या पाच ते सहा वर्षांपासून  एकेकाळचे जिवलग मित्र असलेले राजू शेट्टी आणि सदाभाऊ खोत हे एकमेकांपासून दूर गेले. सदाभाऊ खोत यांनी महायुती सोबत संधान बांधले. तर राजू शेट्टी यांनी महायुती सोबत गेल्या काही वर्षात काडीमोड घेऊन महाविकास आघाडीला जवळ केले. पण या लोकसभा निवडणुकीत एकला चलो ची भूमिका घेतली होती. गेल्या काही वर्षात सदाभाऊ खोत आणि राजू शेट्टी यांचे वारंवार खटके उडताना दिसत आहेत.

दोघांमधील राजकीय दरी वाढलीच आहे शिवाय संघर्ष ही टोकाचा बनला आहे. यंदाच्या लोकसभेत शेट्टी यांच्या पराभवानंतर खोत यांनी अशी पोस्ट करून पुन्हा एकदा शेट्टी यांना शिवसेनेचा प्रयत्न सुरू केला आहे. आगामी विधानसभा निवडणूक डोळ्यासमोर ठेवून सदाभाऊ खोत यांचा हा प्रयत्न असेल का? अशी देखील शंका उपस्थित होत आहे

.

हेही वाचा :

पाणीटंचाईचा मोठा फटका! भाजीपाल्याचे दर कडाडले, नागरिक हैराण

टीम इंडियाला मोठा धक्का, पहिल्याच सामन्यात कॅप्टन Rohit Sharma जखमी

मोठी बातमी! चिमुकल्यांची किलबिल कानी पडणार, १५ जूनला शाळेची घंटा वाजणार