WhatsAPP ची मोठी कारवाई, ७० लाख अकाऊंट केले बंद, तुम्हीही या चुका करू नका, अन्यथा..

व्हॉट्सअॅपने भारतात काही अकाऊंटवर मोठी कारवाई केली आहे. (accounts)व्हॉट्सअॅपने भारतील काही खाती बंद केली आहेत. व्हॉट्सअॅपने एकूण ७१ लाख अकाऊंट बंद केले आहेत. त्यामुळे या अकाऊंटधारकांना व्हॉट्सअॅप प्लॅटफॉर्मचा वापर करता येणार नाही.

भारतातील ७१ लाख व्हॉट्सअॅप यूजर्सने पॉलिसीचं उल्लंघन केल्याप्रकरणी कारवाई केली आहे. (accounts)व्हॉट्सअॅपने मासिक अहवाल जारी केला आहे. मेटाचा मेसेंजर अॅप व्हॉट्सअॅपने भारतात कारवाई केल्याचा मोठा खुलासा केला आहे. व्हॉट्सअॅपने १ एप्रिल २०२४ ते ३० एप्रिल २०२४ रोजी कारवाई केली आहे. या युजर्सने चुकीचे वापर केला. तसेच यापुढेही व्हॉट्सअॅप पॉलिसीचं उल्लंघन केल्यास कारवाई केली जाईल, असा इशारा दिला आहे.

व्हॉट्सअॅपने एकूण ७१,८२,००० अकाऊंट बंद केले आहेत. या अकाऊंटवर एप्रिल महिन्यात कारवाई केली. दरम्यान, कंपनी अॅडवान्स मशीन लर्निंग आणि डेटा एनालाइज करते. यातून संशयित अकाऊंट शोधले जातात. व्हॉट्सअॅपचे जगभरात अब्जो युजर्स आहेत. या अॅपमधून एकमेकांना मेसेज, व्हिडिओ आणि ऑडिओ पाठवतात.

दरम्यान, या व्हॉट्सअॅपने या वर्षाच्या सुरुवातीपासूनच्या महिन्यापासून कारवाई केली आहे. व्हॉट्सअॅपने आतापर्यंत कोट्यवधी अकाऊंट बंद केले आहेत. भारतीय कायदे आणि व्हॉट्सअॅपच्या सेवेच्या अटींचे उल्लंघन केल्याप्रकरणी कारवाई केली जाते.

हेही वाचा :

एटीएममधून पैसे काढणे महागणार; यापुढे किती रुपये आकारले जातील!

अलिबाग समुद्रात पर्यटक बुडाला

भाजप नागनाथ तर काँग्रेस सापनाथ, प्रकाश आंबेडकर यांची जहरी टीका.