‘करीना कपूर तुझे कुटुंबात स्वागत…’, प्रियांका चोप्रा असं का म्हणाली?
बॉलिवूड अभिनेत्री करीना कपूर ही कायमच विविध कारणांनी(family) चर्चेत असते. काही दिवसांपूर्वीच करीना कपूर ही क्रू या चित्रपटात झळकली होती. यात करीना कपूर, तब्बू आणि क्रिती सेनॉन या अभिनेत्री प्रमुख भूमिकेत झळकल्या होत्या. या चित्रपटाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला. आता करीना कपूरसाठी अभिनेत्री प्रियांका चोप्राने एक पोस्ट शेअर केली आहे.
करीना कपूर ही नुकतंच युनिसेफ इंडियाची राष्ट्रीय राजदूत बनली आहे. करीना ही गेल्या दहा वर्षांपासून युनिसेफसोबत काम करत करत आहेत. ती २०१४ पासून युनिसेफसोबत(family) जोडली गेली आहे. मुलांचे हक्क, आरोग्य, शिक्षण आणि स्त्री-पुरुष समानता या सामाजिक प्रश्नांवर आता करीना कपूर काम करताना दिसत आहे. याबद्दल करीना कपूरने इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे.
“माझ्यासाठी आजचा दिवस खूपच खास आहे. दहा वर्षांपूर्वी सुरु झालेला हा प्रवास खूपच सुंदर आहे. मला युनिसेफसोबत केलेल्या कामाचा सार्थ अभिमान आहे. मुलांच्या हक्कांसाठी आणि भविष्यासाठी त्यांचा आवाज बनून मी कायम काम करत राहिन. तसेच देशभरातील महिला आणि मुलांच्या हक्कांसाठी अथक प्रयत्न करणाऱ्या संपूर्ण टीमचे विशेष आभार. गेल्या 75 वर्षापासून भारतातील मुलांसाठी केलेल्या अविश्वसनीय कामासाठी UNICEF इंडियाचेही अभिनंदन. मी लहान मुलांच्या हक्कासाठी कटीबद्ध राहिन”, असे करीना कपूरने म्हटले आहे.
आता करीना कपूरसाठी अभिनेत्री प्रियांका चोप्राने एक पोस्ट शेअर केली आहे. यात तिने करीना कपूरचा एक व्हिडीओ शेअर केला होता. या व्हिडीओला कॅप्शन देताना तिने करीना कपूरला शुभेच्छा दिल्या आहेत. “करीना कपूर तुझे कुटुंबात स्वागत. तू यासाठी नक्कीच पात्र होतीस”, असे प्रियांका चोप्राने म्हटले आहे. सध्या प्रियांका चोप्राने करीनासाठी केलेली पोस्ट चर्चेत आहे.
दरम्यान करीना कपूर ही काही दिवसांपूर्वी क्रू या चित्रपटात झळकली होती. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली होती. तसेच ती आता लवकरच सिंघम अगेन या चित्रपटात झळकणार आहे. यासोबतच करीना ही केजीएफ फेम यशसोबत ‘टॉक्सिक’ या चित्रपटातून दाक्षिणात्य सिनेसृष्टीत पदार्पण करणार होती. आता या चित्रपटातून बाहेर पडल्याचे बोलले जात आहे.
हेही वाचा :
सई ताम्हणकर दिसणार आणखी एका बॉलिवूड चित्रपटात
शेवटच्या दिवशी कोल्हापुरात मुख्यमंत्र्यांचा रोड शो; भर उन्हात हजारो शिवसैनिक रस्त्यावर
मुख्यमंत्री कोल्हापुरात ठाण मांडून बसलेत, तरीही मी निवडणूक जिंकणार : राजू शेट्टी