भारतीय क्रिकेटप्रेमींना पुन्हा एकदा विराट कोहली आणि रोहित शर्माच्या जोडीची झलक पाहायला मिळणार आहे. बीसीसीआयने इंग्लंड दौऱ्यासाठी भारतीय संघाचे(team India) अधिकृत वेळापत्रक जाहीर केले आहे. या दौऱ्यात भारत आणि इंग्लंड यांच्यात 5 टी20 आणि 3 वनडे सामन्यांची मालिका खेळवली जाणार आहे. यामध्ये भारताचे स्टार खेळाडू रोहित शर्मा आणि विराट कोहली खेळताना दिसू शकतात.
कधी पासून सुरु होणार टी20 मालिका?
टी20 मालिकेची सुरुवात 1 जुलै 2026 पासून होणार असून ही मालिका 11 जुलै 2026 पर्यंत खेळवली जाईल. पाच सामन्यांची ही मालिका खालीलप्रमाणे होणार आहे:
1 जुलै: पहिला टी20 – डरहम
4 जुलै: दुसरा टी20 – मँचेस्टर
7 जुलै: तिसरा टी20 – नॉटिंगहॅम
9 जुलै: चौथा टी20 – ब्रिस्टल
11 जुलै: पाचवा टी20 – साउथॅम्प्टन
वनडे मालिका कधीपासून सुरु होणार?
वनडे मालिका 14 जुलै 2026 पासून सुरु होणार आहे. 3 सामन्यांच्या या मालिकेतील सामने पुढील ठिकाणी पार पडतील:
14 जुलै: पहिला वनडे – बर्मिंगहॅम
16 जुलै: दुसरा वनडे – कार्डिफ (सोफिया गार्डन्स)
19 जुलै: तिसरा वनडे – लॉर्ड्स, लंडन
वनडे संघाचे कर्णधारपद सध्या रोहित शर्माकडे आहे आणि विराट कोहलीने अद्याप वनडे क्रिकेटमधून निवृत्ती घेतलेली नाही. त्यामुळे या दौऱ्यात दोन्ही दिग्गज खेळाडू सहभाग घेण्याची शक्यता प्रबळ आहे. दोघेही शेवटचं एकत्र 2025 च्या चॅम्पियन्स ट्रॉफीच्या अंतिम सामन्यात दिसले होते. त्या सामन्यात भारताने न्यूझीलंडला पराभूत करत विजेतेपदावर मोहोर उमटवली होती.
सध्या भारतीय वनडे संघाचं (team India)कर्णधारपद रोहित शर्माकडे आहे आणि विशेष म्हणजे विराट कोहलीनेही वनडे क्रिकेटमधून निवृत्ती घेतलेली नाही. त्यामुळे येत्या इंग्लंड दौऱ्यात होणाऱ्या वनडे मालिकेत हे दोन्ही दिग्गज पुन्हा एकदा मैदानात उतरतील, अशी जोरदार शक्यता आहे.
रोहित आणि विराट यांची जोडी अखेरचं एकत्र दिसली होती ती 2025 च्या चॅम्पियन्स ट्रॉफीच्या अंतिम फेरीत, जिथे भारताने न्यूझीलंडला पराभूत करत विजेतेपदावर शिक्कामोर्तब केलं होतं. तो सामना केवळ ट्रॉफीसाठी नव्हता, तर दोघांनीही पुन्हा एकदा आपली क्लास दाखवली होती. भारताने याआधी 2013 मध्ये चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकली होती, आणि त्यानंतर तब्बल 12 वर्षांनी 2025 मध्ये पुन्हा एकदा हा किताब आपल्या नावे केला.
या भन्नाट वेळापत्रकासह 2026 जुलैमध्ये क्रिकेटचा उत्साह वाढलेला दिसणार आहे. विराट आणि रोहित पुन्हा मैदानात असल्यामुळे ही मालिका चाहत्यांसाठी पर्वणी ठरणार आहे.
हेही वाचा :