ऋषभ पंतशी लग्न करणार का? उर्वशीच्या उत्तराने चर्चा केली शांत

मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री उर्वशी रौतेला आणि भारतीय क्रिकेटपटू ऋषभ पंत यांच्यातील वाद(marry) सर्वांच माहितीये. काही वर्षांपूर्वी पंत आणि उर्वशी डेट करत असल्याच्या बातम्या माध्यमात आल्या होत्या. मात्र काही दिवसांनंतर ऋषभ पंत आणि रौतेलामध्ये बिनसल्याने त्याने तिचा नंबर ब्लॉक केला होता. त्यानंतर सोशल मीडियावर या दोघांचा वाद समोर आला होता. दरम्यान उर्वशीने पंतबाबत अनेकदा भाष्य केली आहेत, पण पंतने त्यावर कोणतीच प्रतिक्रिया दिली नाहीये. आता पुन्हा एकदा उर्वशी एका कार्यक्रमात पंतबद्दल बोललीय.

सोशल मीडियावर एका पॉडकास्टचा व्हिडिओ(marry) व्हायरल झालाय. यात बॉलिवूड अभिनेत्री उर्वशी रौतेलेला भारतीय क्रिकेटर ऋषभ पंतविषयी विचारणा करण्यात आली. यात अर्थात उर्वशीला पंतसोबत लग्न करणार का हाही प्रश्न करण्यात आला होता. पॉडकास्टमधील निवेदकाने उर्वशीला चाहत्यांनी केलेल कमेंट वाचल्या. यात एका चाहत्याने उर्वशी आणि पंतच्या लग्नाविषयी विचारणा केली होती.

सोशल मीडियावरील कमेंट्स वाचत असताना होस्टने विचारले ऋषभ तुमचा आदर करतो. ते तुम्हाला आनंदीदेखील ठेवतील. तू त्याच्याशी लग्न करशील याचा मला आनंद होईल, असं चाहत्याने आपल्या कमेंटमध्ये म्हटलं होतं. यावर काय उत्तर द्यावे हे उर्वशीला समजत नव्हतं. काही क्षण शांत राहिल्यानंतर तिने नो कमेंट, म्हणत हा पंत आणि तिच्या लग्नाचा विषय टाळला.

ऋषभ पंतचा डिसेंबर २०२२ मध्ये अपघात झाला होता. त्यादरम्यान उर्वशी रौतेलाने तंदुरुस्त होण्यासाठी शुभेच्छा देणारी पोस्ट केली होती. आता भारतीय संघासाठी ऋषभ पंत मैदानात उतरण्यासाठी सज्ज झालाय. जवळपास १५ महिने मैदानापासून दूर राहिल्यानंतर पंतने आयपीएलमध्ये पुनरागमन केले. या आयपीएलमध्ये तो चांगल्या फॉर्ममध्ये असल्याचे दिसत आहे.

हेही वाचा :

रणबीर कपूर एकाच वेळी चार मुलींसोबत होता रिलेशनमध्ये

तब्बल 12 वर्षांनंतर कुबेर राजयोग बनल्याने ‘या’ राशींची होणार भरभराट

महाराष्ट्रच्या अनेक जिल्ह्यात तापमान 40 अंश से्ल्सिअच्या पुढे!