ठाकरे एनडीएत परतणार? उद्धव ठाकरे मोदींच्या संपर्कात?

राजकीय वर्तुळातून एक मोठी बातमी…NDA सोबत येण्यासाठी उद्धव ठाकरेंच्या (political news)हालचाली सुरु असल्याचा मोठा दावा शिंदे गटानं केलाय. उद्धव ठाकरे मोदींच्या संपर्कात असून ते लवकरच एनडीएसोबत येतील असा दावा करण्यात आलाय. त्यामुळे उद्धव ठाकरे एनडीएत परतले तर शिंदे काय करणार असा सवाल या निमित्तानं उपस्थित होतोय. यावरचा विशेष रिपोर्ट.

लोकसभा निवडणूक(political news) निकालाला अवघे काही दिवस शिल्लक असताना शिदे गटाच्या दीपक केसरकरांनी खळबळजनक दावा केलाय. उद्धव ठाकरे यांच्याकडून पंतप्रधान मोदींना भेटण्यासाठी प्रयत्न सुरुएत. उद्धव ठाकरेंना NDA मध्ये यायचंय. त्यासाठी उद्धव ठाकरे हे विविध लोकांच्या माध्यमातून पंतप्रधान मोदींना मेसेज पाठवत असल्याचा दावा केसरकरांनी केलाय. त्यामुळे राज्याच्या राजकारणात नवा ट्विस्ट आलायं.

2019 मध्ये युती तोडून सत्तेचा नवा सारीपाट उद्धव ठाकरेंनी मांडला. त्यातून महाविकास आघाडीची निर्मिती झाली..अडिच वर्षांच्या सरकारमध्ये ठाकरेंनी मोदींवर चांगलंच तोंडसुख घेतलं होतं. त्यातच शिंदेंनी बंड केलं आणि महायुतीची निर्मिती झाली. त्यामुळे भाजपसोबत ठाकरेंच्या मनोमिलनाची सुतराम शक्यता नसल्याचं राज्यातील राजकीय परिस्थितीवरुन जाणवत. तर हे ठाकरेंच्या हातात नसून त्यांना एनडीएत घ्यायचे की नाही याचा निर्णय मोदी-शाह घेतील असा टोला शिंदे गटाचे प्रवक्ते संजय शिरसाटांनी लगावलाय.

राज्यात लोकसभेचे काय निकाल लागतात यावर आगामी राजकीय समीकरणं ठरणार आहेत. त्यामुळे विधानसभेआधी भाजपच्या बेरजेच्या राजकारणासाठी पुन्हा काही वेगळे प्रयोग होणार का आणि त्यातून मनोमिलनाचे प्रयत्न होतात का हे पाहणं महत्त्वाचं असेल. मात्र ठाकरे एनडीएत आल्यास शिंदेंचं काय असा प्रश्न निर्माण होऊ शकतो.

हेही वाचा :

कोल्हापूर हातकणंगले कार्यकर्त्यांची वाढली उत्कंठा ! कोण मारणार बाजी…

रोहितला मैदानात घुसून भेटणाऱ्या फॅनला पोलिसांनी ठोकल्या बेड्या, यानंतर हिटमॅनने जे केलं ते…!

ठाकरे- पवार इज बॅक… आता बंडखोर काय करणार?; विधानसभेपूर्वी राज्यात मोठ्या घडामोडी