रोहितला मैदानात घुसून भेटणाऱ्या फॅनला पोलिसांनी ठोकल्या बेड्या, यानंतर हिटमॅनने जे केलं ते…!

टी-20 वर्ल्डकपला(rohit sharma) सुरुवात झाली असून पहिला सामना अमेरिका विरूद्ध कॅनडा यांच्यामध्ये खेळवण्यात आला. तर टीम इंडियाचा पहिला सामना आयरलँडसोबत होणार आहे. 5 जून रोजी हा सामना खेळवला जाणार असून या सामन्यापूर्वी टीम इंडियाने वॉर्म अप सामना खेळला. बांगलादेश विरूद्ध खेळलेल्या या सामन्यात टीम इंडियाचा विजय झाला. मात्र या सामन्यात एक अशी घटना घडली ज्याची सोशल मीडियावर चर्चा रंगली आहे. या सामन्यादरम्यान रोहित शर्माचा एक चाहता त्याला भेटण्यासाठी मैदानात घुसला मात्र यावेळी पोलिसांनी त्याला पडकलं त्याला बेड्या ठोकल्या.

1 जून रोजी बांगलादेशविरुद्ध खेळल्या गेलेल्या सराव सामन्यादरम्यान टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्माच्या(rohit sharma) एका चाहत्याला अमेरिकेच्या पोलिसांनी अटक केली होती. ज्या प्रकारे अमेरिकन पोलिसांनी रोहितच्या चाहत्याला पकडले, त्याची सोशल मीडियावरही जोरदार चर्चा सुरू आहे. अनेक चाहत्यांना ही गोष्ट रूचलेली नाही.

या घटनेनंतर प्रश्न असा उपस्थित होतोय की, यूएसए पोलिसांनी रोहित शर्माच्या चाहत्याला अटक का केली? शेवटी त्याची चूक काय होती? ज्या चुकीसाठी यूएसए पोलिसांनी रोहितच्या चाहत्याला अटक केली. एकंदरीत सराव सामन्यादरम्यान रोहित शर्माला भेटण्यासाठी तो चाहता मैदानात दाखल झाला होता. रोहित शर्मा फिल्डींग करत असताना हा प्रकार घडला. मैदानावरील अज्ञात व्यक्तीला पाहताच मैदानावर उपस्थित असलेल्या USA चे सुरक्षा कर्मचारी आले आणि त्यांनी त्याला पकडलं.

पोलिसांनी हा प्रकार पाहता रोहित शर्माने पोलिसांना थांबवण्याचा प्रयत्न केला, मात्र पोलिसांनी ते मान्य केले नाही. मात्र मिळालेल्या माहितीनुसार, ग्राउंड स्टाफ आयसीसीच्या अधिकाऱ्यांनी नंतर पोलिसांना समजावून सांगितलं. तेव्हाच पोलिसांनी सहमती दर्शवत या चाहत्यावर कोणतीही कारवाई केली नाही. त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय. रोहितने पोलिसांना थांबवल्याने चाहत्यांची मने जिंकली. सोशल मीडियावर रोहितचं खूप कौतुक होतंय.

या घटनेचा व्हिडीओ व्हायरल झाला असून अमेरिकेच्या पोलिसांनी ज्या पद्धतीने चाहत्याला जमिनीवर फेकलं आणि नंतर बेड्या ठोकल्या. यावेळी सोशल मीडियावर या प्रकरण विविध प्रतिक्रियाही उमटू लागल्या आहेत. एका युजरच्या म्हणण्यानुसार, मेक्सिकोच्या सीमेवर एखाद्या गुंडाला पकडल्यासारखे यूएसए पोलीस वागतायत. तर अजून एका युझरच्या म्हणण्यानुसार, रोहितच्या चाहत्याने अमेरिकेत असं करून मोठी चूक केली. तो मोठ्या अडचणीत येण्याची शक्यता आहे.

बांगलादेश विरूद्धच्या सराव सामना भारतीय टीमने 60 रन्सने जिंकला. प्रथम फलंदाजी करताना टीम इंडियाकडून पंत आणि पंड्या यांच्या दमदार खेळीच्या जोरावर 20 ओव्हर्समध्ये 5 विकेट गमावून 182 रन्स केले. यावेळी प्रत्युत्तरात बांगलादेशची टीम 20 ओव्हर्समध्ये 122 रन्सपर्यंत मजल मारू शकली.

हेही वाचा :

लग्नाचे आमिष दाखवून अल्पवयीन मुलीवर बलात्कार

इचलकरंजी येथील आरटीओ कार्यालयात तपासणीसाठी आलेल्या ट्रकची कागदपत्रं बनावट

शुबमन गिल डिसेंबर महिन्यात अडकणार विवाहबंधनात…