‘जरा बाळाला पकडाल का?’ अवघ्या 15 दिवसांच्या तान्ह्या बाळाला लोकलमध्ये सोडून आई फरार

नवी मुंबईतील हार्बर रेल्वेमार्गावरील सीवूड्स स्थानकात 1 जुलैच्या दुपारी एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला. ३० ते ३५ वयोगटातील एका अनोळखी महिलेने सीएसएमटी-पनवेल लोकलमधून प्रवास करताना आपल्या अवघ्या १५ दिवसांच्या तान्ह्या बाळाचा(baby) परित्याग करून पळ काढल्याची घटना घडली आहे. लोकलमधील दोन तरुणींना मदतीच्या बहाण्याने बाळ सोपवून ती महिला सीवूड्स स्थानकावर न उतरता पळून गेली.

जुईनगरमध्ये राहणारी दिव्या नायडू (१९) आणि तिची मैत्रीण भूमिका माने चेंबूरहून घरी जात असताना सदर सानपाड्यात रेल्वेत चढली व आपणास सीवूड्स स्थानकावर उतरायचे असल्याचे सांगून आपल्याकडे बाळ आणि सामान असल्याने उतरताना मदत करावी अशी विनंती केली. त्या दोघी जुईनगर येथे न उतरता महिलेला मदत म्हणून सीवूड्स स्टेशनला खाली उतरल्या, उतरताना महिलेनं मुलींचा हातात बाळ(baby) दिलं मात्र महिला लोकलमधून न उतरता पसार झाली.

प्रथमदर्शी सामान अधिक असल्यामुळे खाली उतरता आलं नसाव असा अंदाज मुलींनी लावला , बऱ्याच वेळेपर्यंत वाट पाहूनही ती महिला न परतल्यामुळे, त्यांनी बाळासह घरी जाऊन त्याची काळजी घेतली व नंतर वाशी रेल्वे पोलिसांकडे तक्रार दिली.

वाशी रेल्वे पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक किरण उंदरे यांनी दिलेल्या माहितीनुसार, सदर महिलेविरोधात भारतीय न्या. संहिता कलम ९३ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बाळ (baby)सध्या रुग्णालयाच्या अतिदक्षता विभागात आहे. दरम्यान पोलिसांनी चार पथके तयार केले असून याशिवाय सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे फरार महिलेला शोधण्याचे प्रयत्न सुरू आहेत.

सदर महिला ही खानदेशभर रेल्वे स्थानकावर उतरल्याच समजते , मात्र शहरातील सीसीटीव्ही कॅमेरे कार्यान्वित नसल्याने शोध मोहीम अडचणीत असल्याचं पोलिसांनी म्हटले आहे . बाळाच्या आईविषयी कोणालाही माहिती असल्यास वाशी रेल्वे पोलीस ठाण्याशी संपर्क साधावा, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार,बाळ सध्या रुग्णालयाच्या अतिदक्षता विभागात आहे पोलिसांनी चार पथके तयार केले असून सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे फरार महिलेला शोधण्याचे प्रयत्न सुरू आहेत. सदर महिला ही खानदेश्वर रेल्वे स्थानकावर उतरल्याची माहिती समोर आली आहे. मात्र शहरातील सीसीटीव्ही कॅमेरे कार्यान्वित नसल्याने शोध मोहीमेत अडचणी येत असल्याचे पोलिसांनी म्हटले आहे. बाळाच्या आईविषयी कोणालाही माहिती असल्यास वाशी रेल्वे पोलिस ठाण्याशी संपर्क साधावा, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.

हेही वाचा :