“कर्ज फेडण्यासाठी करावं लागतं…”, प्राजक्ता माळीची पोस्ट चर्चेत

मराठमोळी अभिनेत्री प्राजक्ता माळी कायमच सोशल मीडियावर चर्चेत राहण्याचा(loan)प्रयत्न करते. प्राजक्ता नेहमीच इन्स्टाग्रामवर वेगवेगळ्या अंदाजातील फोटो शेअर करत असते. फॅशनसोबतच प्राजक्ताने आपल्या दमदार अभिनयाच्या जोरावर तिने चाहतावर्ग तयार केलेला आहे.

प्राजक्ता एक उत्तम अभिनेत्री, होस्ट आणि बिझनेसवुमन आहे. प्राजक्ता नेहमीच चाहत्यांचे(loan) मन जिंकण्याचा प्रयत्न करते. अशातच प्राजक्ताने नुकतंच इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर केलेला आहे. त्यामध्ये ती फोटोजसाठी वेगवेगळे पोजेस ती देताना दिसते. सध्या प्राजक्ताचा हा व्हिडीओ इन्स्टाग्रामवर कमालीचा व्हायरल होत आहे.

प्राजक्ताने गेल्या काही वर्षांपूर्वी तिच्या स्वत:चा ‘प्राजक्ताराज’ नावाचा ज्वेलरी ब्रँड लाँच केला होता. या द्वारे तिने बिझनेस क्षेत्रात पाऊल ठेवले आहे. ‘प्राजक्ताराज’ ज्वेलरी ब्रँडच्या माध्यमातून खास आपल्या चाहत्यांसाठी अभिनेत्री पारंपारिक दागिने लाँच करते.

प्राजक्ता एक उत्तम अभिनेत्री असून ती ब्रँड अँडोर्समेंटच्या माध्यमातून दमदार कमाई करण्याचा प्रयत्न करत असते. गेल्या काही दिवसांपूर्वी तिने कर्जतमध्ये फार्म हाऊस बांधला होता. यासाठी तिने लाखो रुपयांचं कर्जही घेतलं असल्याचं तिने एका मुलाखतीत सांगितलं होतं. अशातच अभिनेत्रीची एक इन्स्टाग्राम पोस्ट सोशल मीडियावर चांगलीच चर्चेत आली आहे.

त्यामध्ये प्राजक्ता माळी अनेक ब्रँडच्या जाहिरातींसाठी फोटोशूट करताना दिसते. त्या दरम्यानचा फोटोशूट करतानाचा एक व्हिडीओ प्राजक्ताने शेअर केलेला आहे. हा व्हिडीओ शेअर करताना प्राजक्ताने कॅप्शन दिले की, “कर्ज फेडायला करावं लागत बाबा…”असं कॅप्शन देत तिने हा व्हिडीओ शेअर केलेला आहे. त्यासोबतच प्राजक्ताने हा व्हिडीओ शेअर करताना #aboutlastweek, #endorsements, #modelshoot, #BTS, #behindthescenes असे हॅशटॅग तिने वापरले आहे. अभिनेत्री आपल्या घराचं कर्ज फेडण्यासाठी कशी मेहनत घेतेय, हे आपल्याला व्हिडीओ पाहिल्यावर कळेल. प्राजक्ताच्या या व्हिडिओवर चाहत्यांनी मजेशीर कमेंटही केल्या आहेत.

प्राजक्ता माळीच्या व्हिडीओवर चाहते कमेंट करत म्हणतात, “तुमच्यासारखं कर्ज आम्हाला पण होऊ देत आणि तुमच्यासारखं काम पण मिळूदे रे देवा.”, “सो ब्यूटिफुल”, “दमली, फोटो काढून”, “टेंशन नको घेऊस, प्राजु सगळं नीट होईल. कर्ज काय ते तर फिटेलच, तुझी सगळी स्वप्नं पूर्ण होवोत अशी देवाकडे प्रार्थना” तर अनेकांनी प्राजक्ताच्या सौंदर्याचे कौतुक केले आहे. प्राजक्ता माळीच्या ह्या व्हिडीओवर चाहत्यांकडून कमेंट्सचा वर्षाव होत असून १७ हजारांहून अधिक चाहत्यांनी लाईक्सचा वर्षाव केला आहे.

हेही वाचा :

मोठी बातमी! केंद्रीय गृहमंत्रालयात भीषण आग; कॉम्प्युटर, कागदपत्रे जळून खाक

“रवी किशन माझे पती”; निवडणुकीपूर्वी भाजप खासदार वादाच्या भोवऱ्यात; मुलगीही आली समोर

मशालीने हुकूमशाही भस्म करायची; मशाल गीत लाँच केल्यानंतर उद्धव ठाकरेंकडून सत्ताधाऱ्यांवर टीकास्त्र