सकाळी सभा झाली, अणि संध्याकाळी अवकाळी पाऊस; आदित्य ठाकरेंचा भाजपवर हल्लाबोल
छत्रपती संभाजीनगर येताना लोक सांगतं होते, दिल्लीत इंडिया आघाडीच सरकार येणार, मात्र सकाळी भाजपाची सभा झाली आणि अवकाळी पाऊस झाला, असा खोचक टोला आदित्य ठाकरे यांनी भाजपला जालन्यातील सभेत लगावला आहे. 2014 पूर्वी एक चेहरा होता, चांगलं सरकार भाजप आणणार असं वाटत होतं मात्र 2014 नंतर सगळं चित्र बदललं. 2019 पर्यंत उद्धव ठाकरेंनी सगळं सोडून यांना पाठिंबा दिला. मात्र त्यांनी विश्वास घात केला, केल्याचा आरोप आदित्य ठाकरे यांनी केला.