पृथ्वी शॉ च्या ‘त्या’ झेलवरून रंगली सोशल मीडियावर चर्चा..

आयपीएल स्पर्धेतील 40 सामना दिल्ली कॅपिटल्स आणि गुजरात टायटन्स यांच्यात सुरु आहे. या सामन्यातील विजय दोन्ही संघांना महत्त्वाचा आहे. त्यामुळे विजयासाठी दोन्ही संघांची धडपड सुरु आहे. नाणेफेकीचा कौल गुजरात टायटन्सच्या बाजूने लागला आणि कर्णधार शुबमन गिल याने गोलंदाजीचा निर्णय घेतला. पृथ्वी शॉ आणि जेक फ्रेझर मॅकगुर्क या जोडीने चांगली सुरुवात करून दिली. पण संदीप वॉरियरच्या गोलंदाजीवर जेक फ्रेझर-मॅकगुर्क 11 धावा करून बाद झाला. त्यानंतर त्याच षटकाच्या पाचव्या चेंडूवर पृथ्वी शॉ बाद झाला. नूर अहमदने पृथ्वी शॉचा अप्रतिम झेल पकडला. मात्र हा झेल आता वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे. सोशल मीडियावर या झेलबाबत जोरदार चर्चा रंगली आहे.

मैदानावरील पंचांना या झेलबाबत संशय होता म्हमून थेट तिसऱ्या पंचाकडे दाद मागितली. नूर अहमदही झेलबाबत संभ्रमात होता. पण तिसऱ्या पंचांनी व्हिडीओ वेगवेगळ्या अँगलने पाहिला आणि बाद असल्याचं घोषित केलं. उजवा हाताची बोटं चेंडूखाली असल्याचं कारण दिलं. तसेच डाव्या हाताची बोटं सपोर्टसाठी वापरली असल्याचं तिसऱ्या पंचांनी निर्णय देताना सांगितलं. तसेच स्क्रिनवर आऊट असल्याचं जाहीर केलं आणि पृथ्वी शॉला क्रिझ सोडावं लागलं.

आता सोशल मीडियावर नेटकरी आपआपली मतं मांडत आहेत. कोणी आऊट असल्याचं, तर कोणी नाबाद असल्याचं सांगत आहे. नेटकरी आपआपली मतं मांडत असून जोरदार चर्चा रंगली आहे.गुणतालिकेत गुजरात टायटन्स 8 गुण आणि -1.055 नेट रनरेटसह सहाव्या स्थानी, दिल्ली कॅपिटल्स 6 गुण आणि -0.477 नेट रनरेटसह आठव्या स्थानी आहे. प्लेऑफच्या दृष्टीने दोन्ही संघांना या सामन्यातील विजय महत्त्वाचा आहे.

दिल्ली कॅपिटल्स (प्लेइंग इलेव्हन): पृथ्वी शॉ, जेक फ्रेझर-मॅकगर्क, अभिषेक पोरेल, शाई होप, ऋषभ पंत (विकेटकीपर/कर्णधार), ट्रिस्टन स्टब्स, अक्षर पटेल, कुलदीप यादव, एनरिक नॉर्टजे, खलील अहमद, मुकेश कुमार.

गुजरात टायटन्स (प्लेइंग इलेव्हन): रिद्धिमान साहा (विकेटकीपर), शुभमन गिल (कर्णधार), डेव्हिड मिलर, अजमतुल्ला ओमरझाई, राहुल तेवतिया, शाहरुख खान, रशीद खान, रविश्रीनिवासन साई किशोर, नूर अहमद, मोहित शर्मा, संदीप वॉरियर.