‘या’ आठवड्यात ओटीटीवर प्रेक्षकांना पाहायला मिळणार थरार, चित्रपट अन् वेबसीरिज;

सध्या उन्हाळ्याचे दिवस असल्याने घराबाहेर पडायला लोक कंटाळा करत आहेत. अगदी सिनेमागृहात जाऊन एखादा चित्रपट  पाहायलाही प्रेक्षकांना कंटाळा येत आहे. तर घरबसल्या ओटीटीवर एखादा चित्रपट किंवा वेबसीरिज पाहायला ते पसंती दर्शवत आहेत.  या आठवड्यात ओटीटीवर अनेक वेबसीरिज आणि चित्रपट प्रदर्शित होत आहेत. घरबसल्या एखादा चांगला चित्रपट किंवा वेबसीरिज पाहायचा विचार करत असाल तर जाणून घ्या ‘या’ आठवड्यात ओटीटीवर काय रिलीज होणार… नेटफ्लिक्स प्राईम व्हिडीओ, डिज्नी प्लस हॉटस्टार या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रेक्षकांना या सीरिज पाहता येतील.

रणनीती : बालाकोट अॅन्ड बियॉन्ड (Ranneeti: Balakot And Beyond)
कधी रिलीज होणार? 24 एप्रिल 2024 
कुठे पाहाल? जिओ सिनेमा

जिमी शेरगिल, आशुतोष राणा आणि लारा दत्ता यांची अॅक्शन, थ्रिलर वेबसीरिज ‘रणनीती: बालाकोट अॅन्ड बियॉन्ड’ प्रेक्षकांना 24 एप्रिलपासून जिओ सिनेमावर पाहता येणार आहे. 2019 मधील बालाकोट हवाई दलावर ही सीरिज आधारित आहे. 

भीमा (Bhima)
कधी रिलीज होणार? 26 एप्रिल 2024 
कुठे पाहाल? डिज्नी प्लस हॉटस्टार

‘भीमा’ हा अॅक्शन, नाट्य असणारा चित्रपट 26 एप्रिल 2024 रोजी डिज्नी प्लस हॉटस्टारवर रिलीज होत आहे. एका छोट्या शहरातील मंदिरात घडणाऱ्या रहस्यमय घटनांवर आधारित ही सीरिज आहे. या सीरिजमध्ये गोपीचंद, प्रिया भवानी शंकर आणि मालविका शर्मा प्रमुख भूमिकेत आहेत.

क्रॅक (Crack)
कधी रिलीज होणार? 26 एप्रिल 2024
कुठे पाहाल? डिज्नी प्लस हॉटस्टार

अर्जुन रामपाल आणि विद्युत जामवाल यांची ‘क्रॅक’ ही सीरिज या आठवड्यात ओटीटीवर रिलीज होणार आहे. मुंबईतील एका स्टंटमॅनवर आधारित हा चित्रपट आहे. 26 एप्रिल 2024 रोजी हा सिनेमा डिज्नी प्लस हॉटस्टार या ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज होणार आहे.

दिल दोस्ती डिलेमा (Dil Dosti Dilemma)
कधी रिलीज होणार? 25 एप्रिल 2024
कुठे पाहाल? प्राईम व्हिडीओ

‘दिल दोस्ती डिलेमा’ ही सीरिज 25 एप्रिल 2024 रोजी प्राईम व्हिडीओवर प्रदर्शित होणार आहे. या सीरिजमध्ये प्रेक्षकांना नाट्य पाहायला मिळणार आहे.

ब्रिगंती (Briganti), डिलिव्हर मी (Deliver Me), ‘द बिग डोअर प्राईज सीझन 2’ (The Big Door Prize Season 2), सिटी हंटर (City Hunter), डेड बॉय डिटेक्टिव्हज (Dead Boy Detectives), गुडबाय अर्थ (Goodboy Earth), ‘किंग फू पांडा 4’ (King Food Panda 4) हे चित्रपट आणि वेबसीरिजदेखील या आठवड्यात प्रदर्शित होत आहेत.