रोहित शर्मानं आरशासमोर उभं राहून स्वतःला प्रश्न विचारायला हवा

भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने ( BCCI) कालच वार्षिक कराराची घोषणा केली आणि त्यात A + श्रेणीत रोहित शर्माचे नाव पाहून चाहते आनंदी झाले. इंडियन प्रीमिअर लीग २०२५ नंतर भारतीय खेळाडू इंग्लंड दौऱ्यावर जाणार आहेत. रोहितच्या वार्षिक करारातील समावेशामुळे तोही या दौऱ्यावर जाईल हे पक्कं समजलं जात आहे. ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर रोहितने खराब फॉर्मामुळे स्वतःला पाचव्या कसोटीच्या प्लेइंग इलेव्हनमधून बाहेर ठेवले होते. तेव्हाच त्याच्या कसोटी क्रिकेटमधून निवृत्तीच्या चर्चा रंगल्या होत्या. पण, रोहितने तेव्हा, मी कुठे जात नाही. असे सांगितले होते.

३७ वर्षीय रोहितच्या भविष्याबाबत तरीही चर्चा सुरू आहेत. तो आणखी किती वर्ष खेळणार हा अनुत्तरीत प्रश्न आहेच. पण, ऑस्ट्रेलियाचा महान कर्णधार स्टीव्ह वॉ ( Steve Waugh ) याच्या मते रोहितच या प्रश्नाचे उत्तर देऊ शकेल असे म्हटले आहे. रोहितच्या कसोटी व वन डे संघाच्या कर्णधारपदाबाबत आता चर्चा सुरू आहे. इंग्लंड दौऱ्यापासून जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या नव्या हंगामाला सुरुवात होईल आणि भारताला २०२७ मध्ये वन डे वर्ल्ड कप खेळायचा आहे. तोपर्यंत रोहितने या भूमिकेवर कायम राहावे का? असा सवाल विचारला जातोय.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *