राधानगरी काळम्मावाडी धरणातून 1300 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू भोगावती पंचगंगा तुडुंब

सध्या जेवढा पाण्याचा विसर्ग होतो तो राधानगरीपासून शिंगणापूर बंधाऱ्यापर्यंत ठिकठिकाणी अडवला जातो.पाटबंधारे विभागाने राधानगरी धरण आणि काळम्मावाडी धरणातील गैबी बोगद्यातून १३०० (dam)क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू केला आहे.

शिरोळ तालुक्याला पुरेशा प्रमाणात पाणीपुरवठा व्हावा, यासाठी राधानगरी धरणातून ८५०, तर काळम्मावाडी धरणातून ४५० क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू केला आहे. त्यामुळे भोगावतीसह पंचगंगा नदी दुतर्फा ओसंडून वाहत आहे.

शेतीसह पिण्याच्या मोठ्या प्रमाणात पाण्याचा उपसा होत आहे. (dam)सध्या जेवढा पाण्याचा विसर्ग होतो तो राधानगरीपासून शिंगणापूर बंधाऱ्यापर्यंत ठिकठिकाणी अडवला जातो. त्यामुळे पंचगंगा नदीतून शिरोळ तालुक्याला पुरेसे पाणी जात नाही. त्यामुळे पाटबंधारे विभागाने राधानगरी धरण आणि काळम्मावाडी धरणातील गैबी बोगद्यातून १३०० क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू केला आहे.

काल दुपारपर्यंत मोठ्या प्रमाणात पाणी वाहत असल्याचे चित्र आहे. वाढीव पाण्यामुळे शिरोळपर्यंत पाणी जाण्यास मदत होणार आहे. धरणात सध्या दीड टीएमसी पाणीसाठा आहे. जून महिन्यापर्यंत हे पाणी पुरणार आहे. पावसाळ्यापूर्वी धरणातील पाण्याचे योग्य नियोजन केले जाणार आहे. तसेच, आवश्‍यक असणाऱ्या ठिकाणी पाणी सोडून धरणातील पाणीपातळी योग्य प्रकारे ठेवली जाणार आहे. दरम्यान, आज सोडलेल्या पाण्यामुळे शिरोळ तालुक्यात (dam)नदीपात्रात ज्या-ज्या ठिकाणी वीजपंप रिकामे पडले आहेत ते पंप सुरू करून शेतीला पाणी देण्यास मदत होणार आहे.

शिरोळ तालुक्यासाठी पाणी देण्याबाबत वारंवार मागणी होत होती. दरम्यान, भविष्यातील पाण्याचे नियोजन करून राधानगरी धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू केला आहे.

हेही वाचा :

दाभोलकर हत्या प्रकरणाचा जवळपास ११ वर्षांनी निकाल लागणार

तुळजापूर संस्थानमध्ये 8.43 कोटींचा भ्रष्टाचार

 सलमान खान- रश्मिका मंदाना पहिल्यांदाच एकत्र