सलमान खान- रश्मिका मंदाना पहिल्यांदाच एकत्र

बॉलिवूडचा भाईजान अशी सलमान खानची(hindi movie) ओळख आहे. सलमान खानचा यावर्षी ईदचा एकही चित्रपट प्रदर्शित न झाल्याने चाहत्यांमध्ये नाराजी होती. मात्र, ईदच्या दिवशी सलमान खानने सिकंदर चित्रपटाची घोषणा केली होती. चित्रपटात सलमान खानसोबत कोणती अभिनेत्री दिसणार याबाबत चाहत्यांच्या मनात उत्सुकता होती. तर आता सलमान खानसोबत रश्मिका मंदाना मूख्य भूमिकेत दिसणार आहे.

रश्मिका मंदाना आणि सलमान खान ही जोडी सिकंदर चित्रपटाच्या(hindi movie) माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. चित्रपटनिर्माते लवकरच याबाबत अधिकृतपणे घोषणा करतील असे सांगण्यात येत आहे.

याबाबत Nadialwala Grandson या प्रोडक्शन हाउसच्या एक्स अकाउंटवरुन माहिती देण्यात आली आहे. रश्मिका मंदाना आणि सलमान खान पहिल्यांदाच एकत्र काम करणार आहे. या दोघांची केमिस्ट्री पाहण्यासाठी प्रेक्षक खूपच उत्सुक असल्याचे दिसत आहे.

रश्मिका मंदानाच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे तर, तिने दाक्षिणात्य आणि बॉलिवूड चित्रपटांमध्ये काम केले आहे. रश्मिकाने डिअर कॉम्रेड, अॅनिमल, गुड बाय, पुष्पा या चित्रपटात काम केले आहे. रश्मिका चित्रपटांसोबत तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळेही खूप चर्चेत असते. रश्मिका आणि अभिनेता विजय डेवरकोंडाच्या अफेअरच्या चर्चा अनेकदा सोशल मीडियावर होत असतात.

सलमान खानबद्दल बोलायचे झाले तर, तो लवकरच सिकंदर चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. मध्यंतरी अभिनेत्याच्या गॅलेक्सी अपार्टमेंटवर हल्ला करण्यात आला होता. याबाबत पोलिस तपास करत आहेत.

हेही वाचा :

जेंव्हा उघड्यावर अंघोळ करताना दिसली श्वेता तिवारी, मोठा गोंधळ आणि..

मुंबईत धावत्या रिक्षात तरुणीचा विनयभंग, जीवाच्या आकांताने रस्त्यावर उडी मारली

कांद्याचा भाव अचानक कोसळला?; शरद पवार गटाचे पदाधिकारी आक्रमक, लिलाव पाडला बंद