‘पुष्पा द रूल’मधील ६ मिनिटांच्या सीनसाठी खर्च केले ६० कोटी, शूटिंगसाठी लागला १ महिना

बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेता अल्लू अर्जुनच्या पुष्पा २ चित्रपटाची(new movies to watch) प्रेक्षक गेल्या अनेक दिवसांपासून आतुरतेने वाट पाहत आहेत. ‘पुष्पा द राइज’ हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर सुपरहिट ठरला. त्यानंतर या चित्रपटाच्या टीमनं ‘पुष्पा द रूल’ ची घोषणा केली. सध्यातरी प्रेक्षकांच्या भेटीला ‘पुष्पा द रूल’ चं पोस्टर आणि टीझर रिलीज झाला आहे. चित्रपटाच्या टीझरने चाहत्यांचे लक्ष वेधले आहे. टीझरमधील भव्य दिव्य सेट पाहिल्यानंतर या चित्रपटाचं बजेट किती असेल? असा प्रश्न नक्कीच तुम्हाला पडला असेल ना ?, जाणून घेऊयात ‘पुष्पा द रूल’च्या बजेटबद्दल…

अल्लू अर्जुनच्या(new movies to watch) वाढदिवशीच म्हणजे, ८ एप्रिलला ‘पुष्पा द रूल’चा टीझर रिलीज करण्यात आला. टीझरमधील भव्य दिव्य सेट पाहून, डोळे दिपवून टाकणारी लाईट पाहून तुम्हालाही नक्कीच प्रश्न पडला असेल की, या चित्रपटाचं बजेट किती असेल? या चित्रपटातील एका सीनसाठी निर्मात्यांनी पाण्यासारखा पैसा खर्च केलेला आहे.

जेमतेम ६ मिनिटांच्या सीनसाठी निर्मात्यांनी तब्बल ६० कोटी रूपये खर्च केले आहेत. फक्त ६ दिवसाचे सीन शूट करण्यासाठी निर्मात्यांना जवळपास एक महिन्याचा कालावधी लागला आहे. चित्रपटात ‘गंगम्मा जत्रा’ आणि एक फाइट सीन आहे. फक्त तो ६ मिनिटांचा सीन शूट करण्यासाठी निर्मात्यांनी ६० कोटी रुपये खर्च केले आहेत. हा सीन शूट करण्यासाठी तब्बल ३० दिवस लागले होते.

चित्रपट येत्या १५ ऑगस्ट २०२४ ला रिलीज होणार असून निर्मात्यांनी या चित्रपटावर मोठ्या प्रमाणावर खर्च केला आहे. या चित्रपटाचं एकूण बजेट ५०० कोटींच्या आसपास पोहोचले आहे. बॉलिवूड लाईफने दिलेल्या माहितीनुसार, नेटफ्लिक्स या ओटीटी प्लॅटफॉर्मने ‘पुष्पा द रूल’ चित्रपटाचे डिजिटल राइट्स विकत घेतले आहेत.

नेटफ्लिक्सने ‘पुष्पा द रूल’चे राइट्स १०० कोटी रुपयांना विकत घेतले आहेत. ‘पुष्पा द रूल’ चित्रपटाचे ग्लोबल म्युझिक राइट्स आणि हिंदी सॅटेलाइट राइट्स टी-सीरीजने ६० कोटी रुपयांना विकत घेतले आहे, असं म्हटलं जात आहे. रिलीजआधीच ‘पुष्पा द रूल’ चित्रपटानं जवळपास १६० कोटींची कमाई केली आहे.

भारतातील बिग बजेट चित्रपटांमध्ये ‘पुष्पा २’चा समावेश असणार आहे. ‘पुष्पा’प्रमाणेच ‘पुष्पा २’हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर यशस्वी घोडदौड करेल, यामध्ये शंका नाही. या चित्रपटाच्या दिग्दर्शनाची धुरा सुकुमार यांनीच सांभाळली आहे. अल्लू अर्जुनसोबत रश्मिका मंदानाही स्क्रीन शेअर करणार आहे. तर फहद फासिल खलनायकाच्या भूमिकेत दिसेल. या चित्रपटाची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत आहेत.

हेही वाचा :

“भ्रष्टाचाराचं शेण खाण्यापेक्षा मटण केव्हाही चांगले,” मोदींच्या टीकेला राऊतांचे प्रत्युत्तर

मुलींना मासिक पाळी दरम्यान मिळणार सुट्टी, या राज्यातील विद्यापीठाने घेतला मोठा निर्णय

मोदी पूर्णपणे अपयशी पंतप्रधान, विकासाचे गुजरात मॉडेल म्हणजे बुडबुडे; ठाकरे गटाची बोचरी टीका