पुण्यातील मॉडेल कॉलनी परिसरात मानवतेला काळिमा फासणारी धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. येथील एका तरुणाने भटक्या कुत्र्यावर(dog) लैंगिक अत्याचार केल्याचा व्हिडिओ समोर आला असून, या प्रकरणाने संपूर्ण परिसरात संतापाची लाट उसळली आहे. प्राणीप्रेमींनी संबंधित तरुणाविरोधात चतुःश्रृंगी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.

ही घटना २२ ते २३ सप्टेंबर दरम्यान पहाटे चार ते पाचच्या सुमारास घडल्याचे समोर आले आहे. व्हिडिओच्या आधारे पोलिसांनी संशयित श्यामराव धोत्रे या वडारवाडीतील रहिवाशाला अटक केली आहे. या प्रकरणी ५९ वर्षीय संजय शिंदे यांनी तक्रार दाखल केली असून, ते भाग्येंद्र चुडासामा, साहिल करांडे आणि रॉजर जोसेफ या मित्रांसह परिसरातील भटक्या कुत्र्यांना नियमित चारा देतात.
शिंदे यांनी सांगितले की, १० ऑक्टोबर रोजी महादेव मंदिराजवळील एक कुत्रा अचानक गायब झाल्याचे लक्षात आले. त्यानंतर शोध घेताना व्हिडिओ फुटेजमध्ये कुत्र्यावर(dog) अत्याचार झाल्याचे स्पष्ट दिसले. त्या आधारे पोलिसांकडे तक्रार नोंदवण्यात आली.पोलीस उपनिरीक्षक स्नेहल पाटील यांनी या प्रकरणी तक्रार दाखल करून बीएनएस आणि प्राण्यांवरील क्रूरता प्रतिबंधक कायद्याखाली गुन्हा नोंदवला आहे. पोलिसांनी आरोपी श्यामराव धोत्रे याला अटक केली असून त्याच्याकडून पुढील चौकशी सुरू आहे.या अमानुष घटनेनंतर पुण्यातील नागरिक आणि प्राणीप्रेमींमध्ये तीव्र रोष व्यक्त केला जात असून आरोपीला कठोर शिक्षा द्यावी, अशी मागणी सर्व स्तरांतून होत आहे.
हेही वाचा :
सांगली पोलिस कॅन्टीनमध्ये ७४ लाखांचा अपहार, अधिकाऱ्यांसह, कॅन्टीन व्यवस्थापकावर गुन्हा
क्रिकेटपटू स्मृती मानधना इंदौरची सून होणार, कोण आहे होणारा नवरा…
रीलच्या नादात जीव टाकला धोक्यात, महिलेने साडीलाच लावली आग अन् घरभर पळत सुटली अन् Video Viral