दीड वर्षाच्या चिमुकल्याचा म्हैसाळ कालव्यात बुडून मृत्यू

कवठेमहांकाळ घरासमोर खेळत (Mhaisal) असताना म्हैसाळ योजनेच्या कालव्यात पडल्याने श्रवण प्रशांत पाटील या दीड वर्षाच्या चिमुकल्याचा बुडून मृत्यू झाला. बोरगाव (ता. कवठेमहांकाळ) येथे ही हृदयद्रावक घटना सोमवार, दि. 25 रोजी सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास घडली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बोरगाव येथे प्रशांत पाटील कुटुंबीयांच्या घरासमोर म्हैसाळ योजनेचा कालवा आहे. सकाळी चिमुकला श्रवण नेहमीप्रमाणे घरासमोर खेळत होता. खेळता खेळता तोल गेल्याने तो पाण्याने भरलेल्या कालव्यात पडला.(Mhaisal) काही वेळाने तो घरात न दिसल्याने त्याचे चुलते प्रतीक पाटील यांनी तातडीने त्याचा शोध सुरू केला. कालव्यात पडलेल्या ठिकाणापासून सुमारे दीड किलोमीटरवर तो पाण्यात आढळून आला. त्याला तातडीने बाहेर काढून कवठेमहांकाळ येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. मात्र, वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तो उपचारापूर्वीच मृत झाला असल्याचे घोषित केले. या घटनेची माहिती उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. मारकवाड यांनी कवठेमहांकाळ पोलिस ठाण्यात दिली. त्यानुसार पोलिसांनी अकस्मात मृत्यू अशी नोंद केली.

हेही वाचा

जत तालुक्यात पाणी टंचाईचे संकट

आनंदाची बातमी! म्हाडाच्या घरांच्या किंमती कमी होणार?

चालकाच्या चुकीने डंपर उड्डाणपुलाला लटकला