मोबाईल नंबर शेअर न करता बिनधास्त करा चॅटिंग, व्हॉट्सअॅप युझरनेम फीचर कसं वापरायचं ? पाहा

व्हॉट्सअॅप वापरणाऱ्यांसाठी (sharing)एक मोठी आणि महत्त्वाची अपडेट समोर येत आहे. आता लवकरच तुम्हाला मोबाईल नंबर शेअर न करता थेट चॅटिंग करता येणार आहे. यासाठी व्हॉट्सअॅप एक नवीन “Username” फीचर आणत आहे, ज्यामुळे प्रायव्हसी आणखी मजबूत होणार आहे.

आत्तापर्यंत एखाद्याशी (sharing)व्हॉट्सअॅपवर बोलायचं असेल तर मोबाईल नंबर देणं गरजेचं होतं. पण या नव्या फीचरमुळे तुम्ही फक्त तुमचा युझरनेम शेअर करून समोरच्या व्यक्तीशी संपर्क साधू शकता. म्हणजेच नंबर लपवूनही सहज संवाद साधता येणार आहे.हे फीचर विशेषतः त्या लोकांसाठी फायदेशीर ठरणार आहे जे अनोळखी लोकांशी किंवा ऑनलाइन कामाच्या निमित्ताने चॅट करतात.

यामुळे स्पॅम कॉल्स, (sharing)अनोळखी मेसेजेस आणि प्रायव्हसीशी संबंधित धोके कमी होण्याची शक्यता आहे.युझरनेम सेट करण्यासाठी व्हॉट्सअॅपच्या सेटिंग्समध्ये जाऊन प्रोफाइल सेक्शनमध्ये नवीन “Username” पर्याय दिसेल. तिथे तुम्ही एक युनिक नाव निवडू शकता.

एकदा सेट केल्यानंतर तुमचा नंबर न दाखवता लोक तुम्हाला त्या नावाने शोधू शकतील.सध्या हे फीचर टेस्टिंग फेजमध्ये असून काही बीटा युझर्सना उपलब्ध झाले आहे. लवकरच सर्वांसाठी हे अपडेट रोलआउट होण्याची शक्यता आहे. त्यामुळे येत्या काळात व्हॉट्सअॅप वापरण्याचा अनुभव अधिक सुरक्षित आणि सोपा होणार आहे.