मराठा आरक्षणासाठी लढा देणारे मनोज जरांगे यांची प्रकृती बिघडली आहे. ते आज नांदेडच्या दौऱ्यावर आहेत. यावेळी अचानकपणे त्यांच्या पोटात दुखायला लागले. परिणामी त्यांना तत्काळ रुग्णालयात (hospital)दाखल करण्यात आले. मनोज जरांगे यांनी मराठा आरक्षणासाठी पुन्हा एकदा शड्ड ठोकला आहे. त्यांनी वेगवेगळ्या मागण्यांसाठी सरकारला अल्टिमेटम दिले आहे. येत्या 29 ऑगस्ट रोजी ते राज्यभरातील मराठा समाजाच्या लोकांना घेऊन मुंबईत दाखल होणार आहेत.

हा मोर्चा एकदा मुंबईत आला तर काहीही झालं तरी आम्ही मागे हटणार नाही, असा इशाराच जरांगे यांनी सरकारला दिलाय. दरम्यान, एकीकडे ते या मोर्चाची तयारी करत असाताना दुसरीकडे नांदेडमध्ये त्यांची प्रकृती अचानकपणे खालावली आहे. त्यांना तत्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आलंय.

मराठा आरक्षणासाठी लढा देणारे मनोज जरांगे यांची प्रकृती बिघडली आहे. ते आज नांदेडच्या दौऱ्यावर आहेत. यावेळी अचानकपणे त्यांच्या पोटात दुखायला लागले. परिणामी त्यांना तत्काळ रुग्णालयात (hospital)दाखल करण्यात आले.
ही बातमी आताच ब्रेक झाली आहे. या बातमीला आम्ही अजुनही अपडेट करत आहोत. तुम्हाला सर्वात आधी माहिती पोहोचवण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्यामुळे ह्या पेजला रिफ्रेश करत चला.
हेही वाचा :
शनिवारवाडा ते स्वारगेट भूमिगत रस्त्याला ‘ब्रेक’
राऊतांचा आरोप: “चीनविरोधात बोलण्यास मोदी घाबरतात”
काळं मांजर आडवं जाणं शुभ की अशुभ? जाणून घ्या कोणत्या गोष्टीचे संकेत मानले जातात