महाराष्ट्र राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षामार्फत घेण्यात आलेल्या MHT CET 2025 परीक्षेचा PCM गटाचा निकाल आज जाहीर करण्यात आला आहे.(declared)इंजिनीअरिंग, फार्मसी आणि कृषी अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी ही परीक्षा घेण्यात आली होती. विद्यार्थ्यांना आपला निकाल पाहण्यासाठी CET CELL च्या अधिकृत वेबसाइटवर भेट द्यावी लागणार आहे.वेबसाइटवर जाऊन “MHT CET PCM Result 2025” या लिंकवर क्लिक करून, रजिस्ट्रेशन नंबर आणि पासवर्ड टाकून विद्यार्थ्यांना आपला निकाल पाहता येईल. निकाल डाउनलोड करून भविष्यासाठी सुरक्षित ठिकाणी जतन करण्याचा सल्ला देण्यात आला आहे.
PCM गटाची परीक्षा १९ एप्रिल ते ५ मे २०२५ दरम्यान पार पडली होती(declared). यामध्ये एकूण ४,६४,२६३ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती, तर ४,२२,८६३ विद्यार्थ्यांनी प्रत्यक्ष परीक्षा दिली. दुसरीकडे, PCB गटाची परीक्षा ९ ते १७ एप्रिल दरम्यान झाली होती, आणि त्यासाठी ३,०१,०७२ विद्यार्थ्यांची नोंदणी झाली होती, त्यापैकी २,८२,७३७ विद्यार्थी परीक्षेला उपस्थित होते.
PCB गटाचा निकाल उद्या, १७ जून रोजी जाहीर केला जाणार आहे. निकालानंतर CET 2025 साठी काउन्सेलिंग प्रक्रिया सुरू होईल. (declared)त्यासाठी शेड्यूल CET CELL कडून लवकरच जाहीर करण्यात येईल. विद्यार्थ्यांनी पुढील अपडेटसाठी अधिकृत वेबसाइटवर नियमितपणे भेट देण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
PCM गटासाठी प्रोव्हिजनल उत्तरतालिका २१ मे रोजी तर PCB गटासाठी १८ मे रोजी प्रसिद्ध करण्यात आली होती. विद्यार्थ्यांकडून प्राप्त झालेल्या हरकतींपैकी ४० हरकती वैध ठरल्या असून, त्यावर संबंधित विद्यार्थ्यांना पूर्ण गुण देण्यात येणार आहेत.सध्या CET CELL कडून PCM टॉपर्स यादी किंवा कट-ऑफबाबत कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. ही माहिती अधिकृतपणे प्रसिद्ध होताच, त्याबाबतचा अपडेट विद्यार्थी आणि पालकांना देण्यात येईल.
हेही वाचा :