राज्यातील अनेक महापालिका निवडणुका(elections ) अद्याप झालेल्या नाहीत. त्यातच राज्यातील ‘ड’ वर्ग महापालिका निवडणुकीसाठी तयार करण्यात येणाऱ्या प्रभाग रचनेसाठी तब्बल सव्वा महिना मुदतवाढ दिली आहे. त्यामुळे आता महापालिका निवडणुकाही ऑक्टोबरनंतरच होण्याची शक्यता आहे. प्रभाग रचना पुढे ढकलण्याचा अध्यादेश शासनाने नुकताच जारी केला आहे.
राज्यातील ‘ड’ वर्गात असललेल्या जळगाव महापालिकेसह सर्वा निवडणुकीसाठी शासनाने 12 जून रोजी प्रभाग रचनेचा कार्यक्रम जाहीर केला होता. हा कार्यक्रम जाहीर झाल्यानंतर महापालिका प्रशासन कामालाही लागले होते. जळगाव महापालिका निवडणुकीसाठी आयुक्त ज्ञानेश्वर ढेरे यांच्या अध्यक्षतेखाली निवडणूक समिती नेमण्यात आली आहे. समितीकडून प्रभाग रचना तयार करण्यासाठी आत्तापर्यंत तीन ते चार बैठका घेण्यात आल्या. ही प्रक्रिया सुरू असताना सोमवारी शासनाच्या नगरविकास विभागाने प्रभाग रचनेसंदर्भात सुधारीत आदेश जारी केला.
दरम्यान, या आदेशानुसार आता अंतिम प्रभाग रचना ही सव्वा महिना पुढे ढकलण्यात आली आहे. यापूर्वी प्रभाग रचनेची अंतीम मुदत 1 सप्टेबर होती. ती आता 9 ऑक्टोबर ते 13 ऑक्टोबर या कालावधीत प्रसिध्द केली जाणार आहे. या मुदतवाढीमुळे आरक्षण सोडत, प्रारूप मतदार यादीचाही कार्यक्रम लाबंणीवर पडणार आहे. तसेच निवडणूकाही आता ऑक्टोबरनंतरच होण्याची शक्यता आहे.
इच्छुक उमेदवारांचा पुन्हा हिरमोड
निवडणूक(elections )प्रभाग रचना पुढे ढकल्यामुळे आता निवडणूकाही ऑक्टोबरनंतर होणार आहेत. त्यामुळे निवडणुकीची तयारी करणाऱ्या इच्छुक उमेदवारांचा सध्यातरी हिरमोड झाला आहे. त्यांना आता निवडणुका जाहीर होण्याची प्रतीक्षा करावी लागणार आहे. तसेच निवडणुका होईपर्यंत आपल्या प्रभागात कार्यकर्ते आणि नागरिकांची मर्जी सांभाळावी लागणार आहे.
हेही वाचा :