कोल्हापुरी चपलेचा चालताना कर्रकर्र आवाज का येतो? 99 टक्के लोकांना उत्तर माहिती नसेल

महाराष्ट्राची शान असलेल्या कोल्हापूर चप्पलेची हुबेहुब नक्कल इटलीतील फॅशन शोमध्ये प्राडा नावाच्या कंपनीने केल्याचे समोर आले आहे. त्यामुळं फक्त महाराष्ट्रातच नाही तर भारतातून या कंपनीविरोधात संताप व्यक्त करण्यात येत आहे. कोल्हापूर चपलेची किंमत 2 ते 3 हजारापर्यंत असताना ही कंपनी एक लाखांत विकत असल्याचे सांगितलं जातंय. कंपनीने कोणतेही श्रेय न घेता GI मानांकन असलेल्या चपलेची चोरी करणे सगळ्यांनाच खटकलं आहे. पण कोल्हापुरी(Kolhapuri ) चपलेची अनेक वैशिष्ट्ये आहेत हे आपण पाहुयात.

प्राडा नावाच्या विदेशी फॅशन कंपनीने कोल्हापुरी(Kolhapuri ) चप्पलेची नक्कल करुन ती बाजारात आणली आहे. पण आपली खरी कोल्हापुर चप्पल फक्त दिसायलाच भारी नाहीतर तिची वैशिष्ट्यैदेखील जगात भारी आहेत. तुम्ही अनेकदा पाहिलं असेल की खऱ्या कोल्हापूरी चप्पलेचा चालताना कर्रकर्र आवाज येतो. हा आवाज कशामुळं येतो आणि चप्पलांमध्ये या आवाजाची गरज का भासली हे तुम्हाला माहितीये का? तर यामागे देखील एक भन्नाट कारण आहे. कोल्हापुरी चप्पल ही पारंपारिक पद्धतीने हाताने बनवल्या जातात. या चप्पलांना अमेरिका, जपान आणि इतर देशातूनही मागणी असते.

आज आपण जाणून घेऊयात कोल्हापूर चप्पलेचा चालताना कर्रकर्र असा आवाज का येतो. कोल्हापूरी चपलेत विंचू नावाचा फळ किंवा बिया घातलेल्या असतात. त्यामुळं चालताना कर्रर्रर्र कर्रर्रर्र असा आवाज करतात. हा आवाज खूपच रुबाबदार वाटतो. पण या आवाजामागेदेखील एक कारण आहे. पूर्वीच्या काळात जमीनदार , पाटील, मोठे मोठे बागायतदारांकडे अशा चप्पला असायच्या.

तसंच, साधारण शेतकऱ्यांकडेदेखील कोल्हापुरी(Kolhapuri ) चपला असायच्या. त्यामागचे एक कारण म्हणजे, पूर्वी शेतीची काम करताना आजच्यासारखे तंत्रज्ञान नसायचे. पूर्वी रात्री किंवा संध्याकाळी शेतात जावे लागले तर दिवा किंवा कंदील इतकेच साधन असायचे. मात्र या प्रकाशात फारफार तर पायाखालची जमीन दिसायची. अशावेळी हीच कोल्हापूर चप्पल फार उपयोगी यायची.

संध्याकाळी किंवा रात्री शेतात जावं लागायचं अशावेळी सरपडणारे प्राणी साप किंवा विंचू असे प्राणी असायचे. हे प्राणी चपलेच्या आवाजाने जवळ यायचे नाही. चप्पलेचा कर्रकर्र असा आवाज रात्रीच्या शांततेतदेखील जास्त यायचा अशावेळी कोणतेही सरपटणारे प्राणी जवळ यायचे नाही, अशी यामागची मान्यता सांगितली जाते.

विंचूच्या बिया म्हणजे चपलेच्या तळाशी वापरल्या जाणाऱ्या बिया. या बिया चपलेच्या थरांमध्ये योग्य प्रकारे ठेवल्या जातात, ज्यामुळे चालताना विशिष्ट आवाज निर्माण होतो. या चपलेचा आवाज तिच्या बांधणीवर आणि वापरल्या जाणाऱ्या साहित्यावर अवलंबून असतो. योग्य काळजी घेतल्यास कोल्हापुरी चप्पल अनेक वर्षे टिकते.

हेही वाचा :