एकेकाळी शेतातील पिकांसाठी मारक ठरणारी विषारी बुरशी आता मानवाला नवीन जीवनदान देणारी ठरणार आहे.(cordyceps) एस्परगिलस फ्लेव्हसला विष मानले जातं. पण आता ही बुरशी कॅन्सरच्या उपचारात प्रभावी ठरणार आहे. अमेरिकन शास्त्रज्ञांनी या बुरशीतून एक विशेष घटक काढलाय. त्यानंतर या बुरशीपासून एक औषध बनवण्यात आले आहे. जे कॅन्सरच्या उपचारासाठी खूप उपयुक्त ठरणार आहे. त्यामुळे ही बुरशी विज्ञानाच्या जगात चमत्कारापेक्षा कमी नाहीये.

एस्परगिलस फ्लेव्हस ही अशी बुरशी आहे, जी पिकांवर आढळून येते. या बुरशीत अफ्लाटॉक्सिन नावाचं विष तयार होतं. हे विष मानवाचे यकृत आणि इतर अवयवांना गंभीर परिणाम करते. परंतु अमेरिकेच्या शास्त्रज्ञांनी यातील एक असं रासायनिक तत्व शोधून काढलंय ज्या कॅन्सर्या पेशी नष्ट करण्याची क्षमता ठेवतात.
शास्त्रज्ञांनी या बुरशीपासून एक नैसर्गिक संयुग वेगळे केलंय. जे ट्यूमर पेशींचे डीएनए बदलून नष्ट करते.(cordyceps) ही प्रक्रिया शरीरातील सामान्य पेशींवर परिणाम करत नाही. हे औषध सध्या प्री-क्लिनिकल ट्रायलच्या टप्प्यात असून या औषधाचे सुरुवातीचे निकाल खूप आशादायक आहेत. दरम्यान आतापर्यंत, केमोथेरपी, रेडिएशन आणि शस्त्रक्रिया या कर्करोगाच्या उपचारांच्या मुख्य पद्धती होत्या. परंतु या सर्वांचा शरीरावर खोलवर परिणाम होतो.
जर हे नवीन औषध यशस्वी झाले तर ते कर्करोगाचा उपचार कमी वेदनादायक आणि अधिक प्रभावी बनवू शकते.(cordyceps)या औषधाच्या क्लिनिकल चाचण्या पुढील दोन ते तीन वर्षांत सुरू होऊ शकतात. जर हे औषध मानवी शरीरावर प्रयोगशाळेतील संशोधनात दाखवल्याप्रमाणे प्रभावी ठरले तर कर्करोगाच्या रुग्णांसाठी हा एक क्रांतिकारी बदल ठरेल,असं शास्त्रज्ञांनी म्हटलंय. एकेकाळी प्राणघातक मानली जाणारी बुरशी आता जीवनरक्षक औषध म्हणून उदयास आलीय. हे संशोधन वैद्यकीय क्षेत्रातील एक मोठे पाऊल आहे, परंतु निसर्गातील प्रत्येक घटकाचे दोन चेहरे असतात हे देखील सिद्ध झालंय.
हेही वाचा :
- ५५ रुपयांची पेन्शन योजना? जाणून घ्या दरमहा ३००० रुपये कोणाला आणि कसे मिळतील?
- नागरिकांनो लक्ष द्या! १ जुलैपासून होणार ६ मोठे बदल; तुमच्या खिशाला लागणार कात्री
- ‘या’ 3 शेअर्सचा पोर्टफोलिओमध्ये समावेश करा, 46 टक्क्यांपर्यंत वाढण्याची शक्यता