सर्वसामान्यांना रिक्षा भाडेवाढीचा फटका! प्रवाशांच्या खिशाला कात्री बसणार

आधीच महागाईने त्रस्त असलेल्या कल्याण-डोंबिवली परिसरातील नागरिकांना रिक्षा भाडेवाढीचा नवा झटका बसला आहे.(rickshaw )उपप्रादेशिक परिवहन कार्यालय आणि महानगर परिवहन प्राधिकरणाच्या आदेशानुसार जरी ३ ते ५ रुपयांची अधिकृत दरवाढ झाली असली, तरी रिक्षाचालक सरसकट ५ ते १० रुपये जास्त वसूल करत असल्याने प्रवाशांमध्ये तीव्र संताप आहे. कल्याण-डोंबिवली परिसरात रोज रिक्षाने प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या हजारोंच्या घरात आहे. इंधन दरवाढ आणि CNG महाग झाल्याचं कारण पुढे करत रिक्षाचालकांनी भाडे वाढवले. पण नियमानुसार जिथे केवळ ३ रुपये वाढ लागू होते, तिथेही १० रुपये अधिक आकारले जात असल्याचं नागरिकांनी स्पष्ट केलं आहे.

या मनमानीविरोधात प्रवाशांकडून वाहतूक पोलिस आणि RTO यांच्याकडे कारवाईची मागणी करण्यात येत आहे. (rickshaw )मात्र, अद्याप कुठलीही ठोस कार्यवाही होत नसल्याने नागरिकांमध्ये नाराजी वाढली आहे.2022 मध्येही अशाच प्रकारे रिक्षा भाडेवाढीच्या नावाखाली मनमानी वसुली झाली होती. कोरोना काळातही रिक्षाचालकांनी नियम डावलून दरवाढ केली होती, आणि आता पुन्हा तीच पुनरावृत्ती सुरू असल्याची भावना आहे.

उपप्रादेशिक परिवहन अधिकारी आशुतोष बारकुळ यांनी स्पष्ट केले आहे की, (rickshaw )जर कोणी रिक्षाचालक अधिक भाडे आकारत असेल, तर नागरिकांनी 9423448824 या व्हॉट्सअ‍ॅप क्रमांकावर तक्रार करावी. अधिकाऱ्यांनी कडक कारवाईचं आश्वासन दिलं आहे.दरवाढीमुळे नागरिकांचे दैनंदिन प्रवासाचे खर्च वाढले आहेत. शाळा, ऑफिस, बाजार अशा आवश्यक प्रवासांसाठी देखील आता प्रत्येक फेरीला जास्त पैसे मोजावे लागतात. या भाडेवाढीचा फटका सर्वसामान्यांच्या खिशावर बसत असून, मनमानी थांबवण्यासाठी यंत्रणांनी तत्काळ पावले उचलावीत, अशी मागणी होत आहे.

हेही वाचा :