लाडक्या बहि‍णींसाठी महत्त्वाची बातमी! या महिलांना मिळाला नाही जूनचा हप्ता

लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे. लाडकी बहीण योजनेत जूनचा हप्ता जमा होण्यास सुरुवात झाली आहे.(beneficiaries )दरम्यान, काही महिलांना जूनचा जप्ता मिळाला नाही. त्यामुळे महिला चिंतेत आहे. दरम्यान, सध्या लाडक्या बहि‍णींच्या खात्यात पैसे जमा करण्याची प्रोसेस सुरु आहे. महिलांच्या खात्यात पैसे जमा होतील.

लाडकी बहीण योजनेत जर महिलांच्या खात्यात पैसे जमा झाले नाही तर याचा अर्थ असा होतो की, तुम्ही या योजनेतून अपात्र झाला आहात.(beneficiaries ) याआधीही सांगण्यात आले होते की, अपात्र महिलांच्या खात्यात पैसे जमा केले जाणार नाहीत. त्यामुळे अर्जांची पुन्हा पडताळणी सुरु केली आहे.लाडकी बहीण योजनेत महिलांच्या अर्जांची पडताळणी सुरु आहे. यामध्ये ज्या महिलांनी निकषाबाहेर जाऊन अर्ज केले आहेत त्यांना या योजनेचा लाभ मिळणार नाही. यामुळे काही महिलांना या महिन्यात पैसे मिळणार नाहीत.

लाडकी बहीण योजनेत पैसे जमा झाले की नाही हे तुम्ही ऑनलाइन आणि ऑफलाइन पद्धतीने चेक करु शकतात. (beneficiaries )तुम्हाला सर्वात आधी बँकेच्या अॅपवर जायचे आहे. त्यानंतर बँक बॅलेंस चेक करा. ट्रान्झॅक्शन हिस्ट्रीमध्येही जाऊन तुम्हाला पैसे जमा झालेत की नाही हे कळणार आहे. तसेच तुम्ही ऑफलाइन पद्धतीने बँकेत जाऊनदेखील बॅलेंस चेक करु शकतात.

हेही वाचा :