आजकाल सर्वकाही ऑनलाइन झाले आहे. अगदी भाजी घेण्यापासून (payments)ते कोणाला पैसे पाठवायचे असेल तर आपण ऑनलाइन पद्धतीने पाठवू शकतो. पेट्रोल भरल्यानंतरही आपण ऑनलाइन पद्धतीने पेमेंट करतो. परंतु आता तुम्ही आज कोणत्याही पेट्रोल पंपावर यूपीआय पेमेंट करु शकणार नाही. महाराष्ट्रातील अनेक पेट्रोल पंपावर सायबर फसवणुकीचे प्रकार घडले आहे.पेट्रोल पंप चालकांच्या संघटनांनी याबाबत माहिती दिली आहे. यामुळे १० मे पासून पेट्रोल पंपावर यूपीआय किंवा इतर डिजिटल पेमेंट घेणे थांबवण्यात आले आहे. हा निर्णय महाराष्ट्रात घेण्यात आला आहे. विदर्भ, नाशिकमध्ये तुम्ही ऑनलाइन पेमेंट करु शकणार नाहीत.

पेट्रोल पंप चालकांच्या म्हणण्यांनुसार, ऑनलाइन व्यव्हारांमुळे सायबर फसवणुकीचे प्रमाण वाढले आहेत. त्यामुळे खूप नुकसान होते. अनेक वेळा लोक इतरांचे कार्ड वापरुन किंवा नेटबँकिंग करुन निघून जातात. यानंतर तक्रार करतात आणि व्यव्हार रद्द करतात. यामुळे पेट्रोल पंप मालकांने खूप नुकसान झाले आहे.(payments)यामुळेच हा निर्णय घेण्यात आला आहे.याबाबत विदर्भ आणि नाशिक पेट्रोल पंप डीलर्सने पुढाकार घेतला आहे.
या घटनांमुळे पेट्रोल पंपाचे बँक खातेदेखील ब्लॉक करण्यात आले आहे. यानंतर खाती ब्लॉक झाल्यावर व्यव्हारदेखील होत नाही.यामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे.सूत्रांच्या माहितीनुसार, नागपूरमधील काही पेट्रोल पंप मालकांनी १० मेपासून डिजिटल पेमेंट न स्विकारण्याचा निर्णय घेतला आहे. (payments)पेट्रोल घेण्यासाठी फक्त रोख पैसे स्विकारले जातील, वाढत्या डिजिटल फ्रॉडमुळे हा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे.
हेही वाचा :
जम्मू-काश्मीरमधून हादरवून टाकणारी बातमी समोर
लग्नासाठी तगादा लावल्याने प्रेयसीचा गळा दाबून खून; आरोपीला जन्मठेप
‘आगामी काळात शरद पवार आणि अजित पवार राष्ट्रवादीत एकत्र असतील’; ‘या’ बड्या नेत्याचं विधान