या जिल्ह्याला ऑरेंज अलर्ट; जिल्हा प्रशासनाकडून शाळांना दोन दिवसांची सुट्टी

राज्यभरात जोरदार पाऊस सुरु आहे. यातच हवामान विभागाकडून भंडारा जिल्ह्यात पुढील दोन दिवसांसाठी ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे.(holiday)आज सकाळपासून देखील जिल्ह्यातील अनेक भागात मुसळधार पाऊस सुरु आहे. या अनुषंगाने जिल्हा प्रशासनाकडून जिल्ह्यातील सर्व शाळांना दोन दिवसांची सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.राज्यात सर्वत्र जोरदार पावसाने झोडपूर काढले आहे. अनेक जिल्ह्यात पावसाची संततधार सुरु असून पूरस्थिती देखील निर्माण झाली आहे. त्यानुसार भंडारा जिल्ह्यात देखील जोरदार पावसाने अक्षरशः झोडपून काढले आहे. यामुळे सखल भागातील अनेक घरांमध्ये पावसाचे पाणी शिरले आहे. तर हवामान विभागाकडून जिल्ह्यात दोन दिवस ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. यामुळे नागरिकांनी देखील सतर्क राहण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

भंडारा जिल्ह्यात जोरदार पाऊस सुरु आहे. भंडारा जिल्ह्यातील ४० पैकी ३८ मंडळात अतिवृष्टी झाली आहे. (holiday)यात काही भागात पाणी साचले असून पूरजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे. अशा स्थितीत सुरक्षेच्या दृष्टीने भंडारा जिल्हाधिकाऱ्यांनी जिल्ह्यातील सर्व शाळांना आज आणि उद्या अशा दोन दिवसांची सुट्टी जाहीर केली आहे.

जिल्ह्यात मुसळधार पावसाची बॅटिंग सुरू असून जिल्ह्यातील २५ मार्गावरून पावसाचं पाणी वाहतं असल्यानं तो वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे.(holiday)सातत्यानं पाऊस पडत असल्यानं नदीनाले ओसंडून वाहत आहेत. परिणामी, अनेक गावातील सखल भागात पावसाचं पाणी घरांमध्ये शिरायला लागले असून अनेक घरात पाणी शिरायला लागल्यानं जीवनोपयोगी साहित्यसह महत्त्वाच्या वस्तूसह अनेक कुटुंबियांना सुरक्षितस्थळी हलविण्यात आलं आहे.

हेही वाचा :