महाराष्ट्रासह संपूर्ण देशभरात जेवणात भात खाल्ला जातो. भात आणि डाळ खाल्ल्याशिवाय जेवण झाल्यासारखे वाटत नाही.(lemon )जेवणात भातापासून अनेक वेगवेगळे पदार्थ बनवले जातात. फोडणीचा भात, मसालेभात, खिचडी किंवा भाताचे अनेक वेगवेगळे प्रकार बनवले जातात. मात्र जेवणात नेहमीच साधा भात खाऊन कंटाळा आल्यानंतर काहींना काही नवीन पदार्थ खाण्याची इच्छा सगळ्यांचं होते. अशावेळी तुम्ही दुपारच्या जेवणासाठी लेमन राईस बनवू शकता. लिंबू आणि इतर मसाल्यांचा वापर करून बनवलेला भात दक्षिण भारतात मोठ्या प्रमाणावर बनवला जातो. कोशिंबीर किंवा रायत्यासोबत लेमन राईस खाल्ला जातो. दुपारच्या जेवणात किंवा घरी पाहुणे आल्यानंतर काहीतरी वेगळा पदार्थ बनवायचा असल्यास तुम्ही साध्या भाताला सुंदर फोडणी देऊन लेमन राईस बनवू शकता. चला तर जाणून घेऊया लेमन राईस बनवण्याची सोपी कृती

साहित्य:
शिजवलेला (lemon )भात
कांदा
आलं लसूण पेस्ट
कोथिंबीर
तेल
लाल तिखट
जिरं
धणे
कढीपत्ता
शेंगदाणे
मीठ

कृती:
लेमन राईस बनवण्यासाठी सर्वप्रथम, कढईमध्ये तेल गरम करून त्यात शेंगदाणे (lemon )टाकून भाजून घ्या. शेंगदाणे काढून ताटात ठेवा.
गरम तेलात मोहरी, हिंग आणि कढीपत्ता घालून फोडणी तयार करा. त्यानंतर त्यात भाजलेलं शेंगदाणे आणि कांदा घालून सोनेरी रंग येईपर्यंत मिक्स करा.
त्यानंतर त्यात आलं लसूण पेस्ट घालून व्यवस्थित भाजून घ्या. नंतर त्यात कोथिंबीर घालून मिक्स करा.
सर्व पदार्थ खमंग भाजून झाल्यानंतर त्यात हळद, लाल तिखट आणि धणे जिऱ्याची पावडर घालून मिक्स करून घ्या.
मसाले भाजल्यानंतर त्यात शिजवून घेतलेला भात घालून व्यवस्थित मिक्स आणि चवीनुसार मीठ टाका.
५ मिनिटं मंद आचेवर भात ठेवून नंतर त्यात लिंबाचा रस घालून मिक्स करा.
तयार आहे सोप्या पद्धतीमध्ये बनवलेला लेमन राईस. हा भात कोशिंबीर किंवा सॅलडसोबत सुंदर लागेल.
हेही वाचा :