करवीर तालुक्यातील पाचगाव इथल्या शिक्षक कॉलनीत जबरी चोरी झाल्याची घटना उघड झाली आहे.(jewellery )घराच्या मुख्य दरवाजाची कडीकोयंडा तोडून घरात प्रवेश करत दोन बेडरूममधील तीन कपाटे फोडून यातील दहा तोळे सोन्या- चांदीचे दागिने, तसेच रोख १३ हजार रुपयांचा मुद्देमाल चोरट्याने लांबविला आहे. या प्रकरणी पोलीसांकडून तपास करण्यात येत आहे.

कोल्हापूरच्या करवीर तालुक्यातील पाचगाव शिक्षक कॉलनीत सोमवारी मध्यरात्री एकच्या दरम्यान ही चोरी झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे.(jewellery )नथुराम शिंदे हे आपल्या कुटुंबास सोबत शिक्षक कॉलनीत एक वर्षापासून वास्तव्यास आले आहेत. दरम्यान शुक्रवारी ते पत्नी सोबत कामानिमित्त सातारा येथे गेले होते. घरामध्ये त्यांचा मुलगा अशिष शिंदे हा एकटाच होता. नथुराम शिंदे यांना नातीची आठवण आली म्हणून आशिषला त्यांनी शनिवारी सातारा येथे बोलवून घेतले.
यानंतर आशिष घराला कुलूप घालून साताऱ्याला रवाना झाले. हि संधी साधत चोरट्यांनी रात्रीच्या सुमारास घरात प्रवेश करत दागिने व रोख रक्कम लांबविली आहे. दरम्यान सकाळी शेजाऱ्यांना घराचा दरवाजा उघडा दिसला. तात्काळ त्यांनी शिंदे यांची संपर्क साधून दरवाजा उघडा असल्याचे सांगितले. या घटनेची माहिती कळताच करवीर पोलिसांनी तात्काळ दखल घेऊन संपूर्ण परिसर व घटनास्थळाची पाहणी केली.

घरातील दोन्ही बेडरूम मधील एकूण तीन कपाटे कटावणीने फोडली आहेत.(jewellery ) यातून दहा तोळे सोन्या-चांदीच्या दागिन्यासह रोख १३ हजार रुपयांवर चोरट्याने डल्ला मारला. पोलिसांकडून पंचनामा करण्यात आला असून श्वास पथकाच्या सहकार्याने चोरट्यांचा माग काढण्याचा पोलिसांनी प्रयत्न केला. ठसे तज्ञ व स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिस फौजफाट्यासह दाखल होऊन तपास सुरू केला आहे.
हेही वाचा :