सर्वसामान्य नागरिकांसाठी महत्त्वाची बातमी आहे. येत्या दोन आठवड्यात जीएसटी काउसिंलची मिटिंग होऊ शकते.(likely )या दर सुसूत्रीकरण हे मूख्य वैशिष्ट असेल. या जीएसटी काउंसिलच्या बैठकीमध्ये मोठी घोषणा होण्याची शक्यता आहे.या बैठकीत टॅक्स कमी करण्यावर भर दिला जाण्याची शक्यता आहे. मिडिया रिपोर्टनुसार,जीएसटी काउन्सिलच्या बैठकीत काही जीएसटी स्लॅब रद्द होण्याची शक्यता आहे.१२ टक्के जीएसटी स्लॅब रद्द केला जाऊ शकतो या टॅक्स स्लॅबमधील गोष्टींवर ५ टक्के किंवा १८ टक्के टॅक्स स्लॅब लागू शकतोसध्या विमा योजनांवरील १८ टक्के जीएसटी रद्द करण्याचा प्रस्ताव सरकार विचारात घेऊ शकतोसरकार एअर कंडिशनिंगसारख्या उत्पादनावरील २८ टक्के स्लॅब कमी करण्याचा विचार करु शकतो
जीएसटी लागू झाल्यानंतर राज्याचा महसुलातील तोटा भरुन काढण्यासाठीचा भरपाई उपकर मार्चमध्ये संपणार आहे.(likely ) त्यामुळे या उपकराची जागी कदाचित दोन नवीन कर आकारले जाऊ शकतात. यामध्ये एक आरोग्य उपकर आणि स्वच्छ उपकर असू शकतो.कार आणि एसयूव्हीवर लागू असलेल्या भरपाई कराबाबत, भरपाई उपकर संपल्यानंतर त्यांना करात कोणतीही कपात अपेक्षित नाहीये.
१२ टक्के स्लॅब काढू टाकल्यानंतर ट्रॅक्टर, एसी या गोष्टी खरेदीवर फायदा होऊ शकतो. (likely )या वस्तूंवर ५ टक्के स्लॅब लावण्याची शक्यता जास्त आहे. यामुळे ट्रॅक्टर हा खरेदी करणे सर्वसामान्यांच्या खिशाला अजून परवडणारा होणार आहे.तसेच सध्या एसीवर २८ टक्के कर आकारला जात आहे. या करातदेखील कपात होण्याची शक्यता आहे. टर्म लाइफ इन्श्युरन्ससाठी जीएसटी १८ टक्क्यांवरुन ५ टक्के केला जाई शकतो. तसेच विमा कंपन्यांन इनपुट क्रेडिटचा दावा करण्याची परवानगीदेखील मिळू शकते.Nomura यांनी याबाबत माहिती दिली आहे.
हेही वाचा :