महाराष्ट्राच्या विधानसभेच्या सभागृहामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना(political issue) विरोधी पक्षातून इकडे येण्याची ऑफर असं म्हणत सूचक विधान केल्याची राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा आहे. फडणवीसांच्या या विधानाची जोरदार चर्चा रंगलेली असतानाच त्याच दिवशी फोटो सेशनदरम्यानही या दोन्ही नेत्यांमधील देहबोली चर्चेत राहिली.
याच पार्श्वभूमीवर फडणवीस आणि ठाकरेंची बंद दाराआड चर्चा झाल्याची बातमी समोर आली. मात्र या बंद दाराआडच्या चर्चेत काय घडलं याबद्दलचा खुलासा राऊत यांनी केला आहे. पत्रकारांशी बोलताना राऊत यांनी काही वर्षांपूर्वी जय शाहांबरोबर अशीच बंद दाराआड चर्चा झाल्याची आठवण करुन दिली. “कसली बंद दारआड चर्चा राहते का? एवढ्या फटी असतात आणि एवढी लोक बाहेर बसलेली असतात. बंद दाराआड चर्चा मानणारे देवेंद्र फडणवीस आहेत का? बंद दाराआड चर्चा अमित शहांबरोबर देखील झाली होती. माझा त्या बंद दाराआड चर्चेवर अजिबात विश्वास नाही. याला काहीही अर्थ नसतो.
आतमध्ये काय चहा पीत आहेत? एकमेकांना मिठ्या मारत आहेत? का टाळ्या देत आहेत? हे कोणाला कळत नाही. बाहेर येऊन कोणाला काही सांगायचे आहे ते सांग उद्या! अमित शहा आणि उद्धव ठाकरे यांची बंद दाराआड चर्चा झाली तेव्हा मी साक्षीदार आहे. बाहेर सगळे कौरव-पांडव बसले होते पंचा टाकून, मांडीवर थाप मारत” असा टोला राऊतांनी(political issue) लगावला आहे.
“अत्यंत चुकीचं आहे. आम्ही कधीही भारतीय जनता पक्षाबरोबर जाणार नाही. ज्या पक्षाने हिंदुरुदय सम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा पक्ष स्वतःच्या स्वार्थासाठी तोडून अपक्ष आणि चिन्ह चोरांच्या हातात दिलं आणि ते चोर तुमच्या मांडीला मांडी लावून बसले अशा भारतीय जनता पक्षाबरोबर शिवसेना जाईल हा विचार म्हणजे भ्रष्ट विचार आहे,” असं राऊत म्हणाले.
“आमचं बरं चाललं आहे आणि अजून बरं होईल. या गुंडांच्या टोळ्या चालवणाऱ्या लोकांबरोबर आम्ही कशाला जायचं? उद्धव ठाकरे भेटले राज्यांच्या कामासाठी, मुख्यमंत्री महोदय यांच्या दालनामध्ये माजी मुख्यमंत्री भेटले असतील किंवा शिवसेना पक्षप्रमुख भेटले असतील त्यात चुकीचं काय? असा सवाल राऊत यांनी विचारला.
फडणवीस आणि ठाकरेंच्या बैठकीसंदर्भात पत्रकारांनी प्रश्न विचारला असता राऊत यांनी, “संपूर्ण काळात दोन तास भेटले आहेत. एकदा देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाले तेव्हा पुष्पगुच्छ एक कर्टसी म्हणून दिला. काल ते भेटले आहेत. महाराष्ट्रात त्यांनी पुन्हा एकदा त्रिभाषा सूत्री लावणारच हे त्यांनी ‘च’ ला जोर देऊन सांगितलं. तो ‘च’ ला जोर देऊ नका हिंदी सक्ती तुम्हाला महाराष्ट्रात लादता येणार नाही या संदर्भात काही पुस्तका आणि कागदोपत्री पुरावे घेऊन गेले होते आणि त्यानंतर संध्याकाळी दंगल झाली,” असं म्हटलं आहे.
त्रिभाषा सूत्रासंदर्भात बोलताना राऊत(political issue) यांनी फडणवीस यांना टोला लगावला. “देवेंद्र फडणवीस यांचा अभ्यास आहे. ते वकील जरूर आहेत. इंग्रजी भाषा ही जगाची ज्ञानभाषा आहे. तुम्हाला या देशाचं डबकं करायचं असेल तर मग तुम्ही इतर अनेक भाषा आहेत. त्या भाषा चालवा. जगाची ज्ञानभाषा इंग्रजीला कुठेही विरोध होत नाही. जपान आणि चीनने इंग्रजी भाषा स्वीकारली आहे. महाशय आणि हिंदीला कोणी विरोध केला नाही. ते काय सांगत आहेत आता मी हिंदीमध्ये बोललो ना? शालेय शिक्षणात हिंदीची सक्ती नको पुढचा हा मुद्दा मर्यादित आहे,” असं राऊत म्हणाले.
“राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा अजेंडा आमच्यावर थोपवायचा नाही. मिस्टर फडणवीस इथे मराठी राज्यभाषा, मातृभाषा राहणार. इंग्रजी राहील. तिसरी भाषा ही आपल्या मर्जीप्रमाणे विद्यार्थी आणि पालकांनी स्वीकारावी हे आमची त्रिभाषा सूत्र आहे. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे या दोन प्रमुख नेत्यांनी महाराष्ट्रात जी जागृती केली ती कायम आहे,” असं राऊतांनी स्पष्ट केलं.
“तुम्ही आगीशी खेळू नका आणि आम्हाला धमक्याही देऊ नका. मी लावणार ‘च’ म्हणजे? ज्यांनी ज्यांनी महाराष्ट्रामध्ये ‘च’ वर जोर देऊन धमक्या द्यायचा प्रयत्न केला तर तो ‘च’ आहे ना फार महत्त्वाचा आहे. महाराष्ट्राला आम्ही बोललो होतो ना मुंबई सह संयुक्त महाराष्ट्र होणार ‘च’ झाला. तुम्ही नका ‘च’ लावू आम्हाला ‘च’ कुठे लावायचा माहिती आहे,” असा टोमणा राऊतांनी लगावला.
हेही वाचा :