Android युझर्ससाठी मायक्रोसॉफ्ट आउटलुक लाइट ‘या’ तारखेपासून बंद

Microsoft कंपनीने अँड्रॉइड वापरकर्त्यांसाठी एक महत्त्वाचा निर्णय जाहीर केला आहे. (Android users) कंपनीचे हलके आणि कमी क्षमतेच्या मोबाईलसाठी तयार केलेले Outlook Lite हे ॲप लवकरच बंद होणार असून 25 मे 2026 नंतर ते प्रभावीपणे काम करणार नाही. या तारखेनंतर वापरकर्ते ॲप उघडू शकतील, मात्र ईमेल, कॅलेंडर किंवा अटॅचमेंट्स पाहता येणार नाहीत.

कमी स्टोरेज आणि मर्यादित इंटरनेट कनेक्टिव्हिटी असलेल्या स्मार्टफोनसाठी Outlook Lite विकसित करण्यात आले होते. पण आता Microsoft आपल्या सर्व मोबाईल सेवांना अधिक सक्षम आणि फीचर-समृद्ध Outlook Mobile ॲपमध्ये एकत्रित करण्याच्या दिशेने पाऊल टाकत आहे. यामुळे वापरकर्त्यांना अधिक चांगला अनुभव, सुधारित मेलबॉक्स सपोर्ट आणि Microsoft 365 सोबत सखोल इंटीग्रेशन मिळणार आहे.

याआधीच 6 ऑक्टोबर 2025 पासून Outlook Lite च्या नवीन डाउनलोडवर बंदी घालण्यात आली होती, त्यामुळे आता हे ॲप पूर्णपणे बंद करण्याची प्रक्रिया अंतिम टप्प्यात आली आहे. कंपनीने वापरकर्त्यांना वेळेत Outlook Mobile वर स्विच करण्याचा सल्ला दिला आहे, जेणेकरून त्यांचा ईमेल आणि कॅलेंडर डेटा सुरक्षित राहील आणि वापरात अडथळा येणार नाही.

Microsoft च्या माहितीनुसार, Outlook Mobile ॲपमध्ये लॉग इन केल्यावर वापरकर्त्यांना त्यांचे सर्व ईमेल, कॅलेंडर आयटम्स आणि अटॅचमेंट्स पूर्ववत पाहता येतील. त्यामुळे Outlook Lite वापरणाऱ्यांनी लवकरात लवकर नवीन ॲपवर स्थलांतर करणे आवश्यक ठरणार आहे.

हे ही वाचा ;

१८० मुलींचे लैंगिक शोषण, आरोपी निघाला MIM चा नेता

दहावीच्या विद्यार्थ्यांची धाकधूक वाढली! उद्या १० वीचा निकाल लागणार?

अविवाहितांना कॅन्सरचा धोका ८५% जास्त; रिसर्चमधून धक्कादायक माहिती समोर