अल्लू अर्जुनने शेअर केल Pushpa 2 च्या नव्या पोस्टर
चित्रपट निर्माते सुकुमार दिग्दर्शित ‘पुष्पा २ : द रुल’ या चित्रपटाची टीझर रिलीज डेटची घोषणा करण्यात आलीय. पुष्पा २ चा टीझर ८ एप्रिलला रिलीज हहोणार असल्याचे जाहिर करण्यात आले आहे. (Pushpa 2 ) आयकॉन स्टार अल्लू अर्जुनने इन्स्टाग्रामवर या चित्रपटाचे नवे पोस्टर शेअर करत टीझर डेटची घोषणा केलीय. चाहत्यांना रश्मिका मंदाना आणि अल्लू अर्जुन यांना मोठ्या पडद्यावर पुन्हा एकत्र पाहण्याची संधी मिळणार आहे.
या चित्रपटात फहद फासिल, सुनील, अनसूया भारद्वाज, जगदीश आणि इतर कलाकारांचा समावेश आहे. Mythri Movie Makers द्वारे निर्मित आणि देवी श्री प्रसाद यांच्या संगीतासह, पुष्पा २ : द रुल १५ ऑगस्ट २०२४ रोजी चित्रपटगृहामध्ये प्रदर्शित होणार आहे.