सर्पमित्र आणि प्राणिप्रेमी दीपक महावर याचा दुर्दैवी मृत्यू सापाच्या विषामुळे झाल्याने संपूर्ण राघोगड परिसरात शोककळा पसरली आहे.(Snake)दीपक सर्पमित्र म्हणून ओळखला जायचा. त्याने आतापर्यंत हजारो सापांचे प्राण वाचवले होते, पण अखेर त्याच्याच आवडत्या प्राण्यानं त्याला मृत्युमुखी नेलं.ही हृदयद्रावक घटना मध्यप्रदेशच्या गुना जिल्ह्यातील राघोगड येथे घडली. दीपकने एका विषारी कोब्राला आपल्या गळ्यात घालून बाईकवर स्टंट करण्याचा प्रयत्न केला. या धाडसादरम्यान, कोब्रा अचानक चवताळला आणि त्याने दीपकच्या गळ्यावर चावा घेतला. काही क्षणातच दीपक जमिनीवर कोसळला आणि त्याला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र, उपचार सुरू होण्याआधीच त्याचा मृत्यू झाला.

दीपक महावर हे राघोगड परिसरात ‘सर्पमित्र’ म्हणून प्रसिद्ध होते. त्यांच्या सर्पविषयक माहितीमुळे आणि धाडसी कृतीमुळे स्थानिक लोक त्यांच्यावर विश्वास ठेवायचे.(Snake)कोणी घरात किंवा शेतात साप शिरला, तर दीपकलाच बोलावलं जायचं. तो सापाला जिवंत पकडून जंगलात सोडायचा. बाईकवर स्टंट करताना गळ्यात कोब्रा ठेवला होता. स्टंट करत असताना काही जणांनी मोबाईलवर याचा व्हिडिओ देखील शूट केला.
या दरम्यान अचानक कोब्रा अस्वस्थ झाला आणि त्याने दीपकला चावलं. (Snake)विष प्रचंड वेगाने शरीरात पसरलं आणि काही मिनिटांत दीपक बेशुद्ध झालाघटनेनंतर दीपकला तात्काळ राघोगड येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र, तेथे प्रतिजहर साठा पुरेसा नसल्याने त्याला गुना येथे हलवण्यात आलं. पण रस्त्यातच त्याचा श्वास घेत घेत थांबला आणि डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं.
हेही वाचा :