कोहली, पांड्याला टी-२० विश्वचषकासाठी भारतीय संघात स्थान नाही!
क्रिकेटविश्वात सध्या आयपीएलची (IPL) जोरदार चर्चा आहे. आयपीएल संपल्यानंतर लगेच (world cup)आयसीसी टी-२० विश्वचषकाचे सामने सुरु होणार आहेत. यासाठी भारतीय संघाचे माजी खेळाडू संजय मांजरेकर यांनी भारतीय संघातील १५ खेळाडूंची निवड केली आहे. विशेष बाब म्हणजे विराट कोहली, हार्दिक पांड्या यांच्यासह रिंकू सिंग आणि अर्शदीप सिंग यांना भारतीय संघात स्थान देण्यात आलेलं नाही. संजय मांजरेकर यांनी सलामीवीर म्हणून रोहित शर्मा आणि यशस्वी जैस्वालची निवड केली आहे.
रोहित आणि यशस्वीनंतर (world cup)तिसऱ्या क्रमांकाच्या फलंदाजीसाठी केएल राहुलला संधी देण्यात आली आहे. संजय मांजरेकर यांनी चौथ्या क्रमांकावर सूर्यकुमार यादवची निवड केली आहे. तर यष्टीरक्षक म्हणून ऋषभ पंत आणि संजू सॅमसनला निवडले आहे. फिरकीपटू म्हणून कुलदीप यादव आणि युझवेंद्र चहल यांना संधी दिली आहे. तर अष्टपैलू म्हणून रवींद्र जडेजा आणि कृणाल पांड्याचा समावेश करण्यात आला आहे. वेगवान गोलंदाजीसाठी जसप्रीत बुमराह याच्यासह आवेश खान, मोहम्मद सिराज, मयंक यादव आणि हर्षित राणाला संधी दिली आहे.
रोहित शर्मा (कर्णधार), यशस्वी जैस्वाल, केएल राहुल, सूर्यकुमार यादव, रवींद्र जडेजा, कृणाल पांड्या, ऋषभ पंत, संजू सॅमसन, कुलदीप यादव, युझवेंद्र चहल, जसप्रीत बुमराह, आवेश खान, मोहम्मद सिराज, मयंक यादव, हर्षित राणा
विश्वचषकासाठी पात्र ठरलेले २० संघ
अमेरिका, वेस्ट इंडिज, ऑस्ट्रेलिया, इंग्लंड, भारत, नेदरलँड्स, न्यूझीलंड, पाकिस्तान, दक्षिण आफ्रिका, श्रीलंका, अफगाणिस्तान, बांगलादेश, आयर्लंड, स्कॉटलंड, पापुआ न्यू गिनी, कॅनडा, नेपाळ, ओमान, नामिबिया, युगांडा
हेही वाचा :
धक्कादायक! नव्याने पदवीधर झालेल्या तरूणांच्या नोकऱ्या धोक्यात; काय आहे कारण?
अजित पवारांना मोठा दिलासा; कचाकच बटण दाबा वक्तव्यावरून क्लीनचिट
बोटावर शाई दाखवा, दाढी कटिंग फुकट; मतदानाचा टक्का वाढविण्यासाठी सलून व्यावसायिकाचा उपक्रम