लग्न झालेलं असो किंवा नसो, स्वेच्छेने ठेवलेल्या लैंगिक संबंधांना…- हायकोर्ट
नवी दिल्ली- एका बलात्काराच्या प्रकरणावर सुनावणी करताना दिल्ली हायकोर्टाने(high court lawyer) महत्त्वाची टिप्पणी केली आहे. दोन प्रौढ व्यक्ती स्वत:च्या मर्जीने लैंगिक संबंध ठेवत असतील, तर त्यांना ते चुकीचं काम करत आहेत असं म्हणता येणार नाही, असं हायकोर्टाने म्हटलं आहे. कोर्टाने एका व्यक्तीला बलात्काराच्या प्रकरणात जामीन मंजूर केला आहे.
न्यायमूर्ती अमित महाजन यांनी याप्रकरणी सुनावणी घेतली. लैंगिक संबंधांच्या प्रकरणात चुकीच्या(high court lawyer) आरोपांमुळे आरोपीची बदनामी होते असं देखील कोर्टाने म्हटलं आहे. आपला समाज ठरवतो की, लग्नाच्या मर्यादेमध्ये लैंगिक संबंध ठेवले जावेत. पण, दोन प्रौढ व्यक्तींमध्ये लैंगिक संबंध ठेवले जात असतील तर त्यांना चुकीचं ठरवलं जाऊ शकत नाही. त्यांचा विवाह झाला असेल किंवा नाही यामुळे फरक पडत नाही, असं कोर्ट म्हणालं.
खोट्या आरोपामुळे एखाद्या व्यक्तीची प्रतिमा खराब होऊ शकते, शिवाय खऱ्या घटनांची विश्वसनीयता कमी होते, असं देखील कोर्टाने म्हटलं. एका महिलेने आरोप केला होता की आरोपीने तिच्यावर बळजबरीने अनेकवेळा लैंगिक संबंध ठेवले आहेत. शिवाय लग्नाचे आश्वासन देखील दिले होते. पण, त्यानंतर तो लग्नाच्या आश्वासनापासून फिरला होता.
आरोपीचे लग्न झालेले असून त्याला दोन मुलं देखील आहेत. महिलेने आरोप केलाय की, व्यक्ती त्याच्याकडे भेटवस्तू मागायचा. महिलेने आतापर्यंत १.५ लाख रुपये आरोपीला दिल्याचं म्हटलं आहे. कोर्टाने यावर म्हटलं की, जेव्हा कथित घटना घडली तेव्हा महिला सज्ञान होती. तसेच लग्नाच्या आश्वासनामुळे तिने आरोपीला लैंगिक संबंधांची परवानगी दिली होती. याबाबत कोर्ट अधिक तपास करणार आहे.
कोर्ट म्हणालं की, महिला तक्रार दाखल करण्याआधी आरोपी व्यक्तीशी भेट होते. शिवाय आरोपीचे लग्न झाल्याचे माहिती असताना देखील संबंध ठेवू इच्छित होती. कोर्टाने असं स्पष्ट केलंय की, व्यक्तीला जामीन देण्यात आलं आहे. पण, त्याने लग्नाचे खोटे आश्वासन दिले का? त्याचा हेतू चुकीचा होता का? यासंदर्भात पुराव्याच्या आधारे अंतिम निर्णय घेण्यात येईल.
हेही वाचा :
काय सांगता! रडणे देखील आरोग्यासाठी फायदेशीर आहे
जान्हवी कपूरच्या होणाऱ्या दिराला डेट करतेय सारा अली खान?
भाजपचे उमेदवार उज्ज्वल निकम यांना उद्धव ठाकरे मतदान करणार? कारण…