अक्षय तृतीयेला सोन खरेदीवर विशेष ऑफर!
हिंदू धर्मात अक्षय तृतीयेच्या(special offer) सणाला विशेष महत्त्व आहे. या दिवशी सोने-चांदी खरेदी करणे खूप शुभ मानले जाते. यंदा हा सण 10 मे म्हणजेच शुक्रवारी साजरा होणार आहे. अक्षय तृतीयेच्या आधी सोन्या-चांदीच्या भावात वाढ होत असते, पण देशातील टॉप ज्वेलरी ब्रँड्सनी या खास प्रसंगी अनेक ऑफर्स दिल्या आहेत. अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर, ग्राहकांना सोने आणि हिऱ्यांच्या दागिन्यांची खरेदी करताना मेकिंग चार्जेसवर 25 टक्के सूट मिळत आहे.
टाटाचा प्रसिद्ध ज्वेलरी ब्रँड तनिष्क या अक्षय तृतीयेला आपल्या ग्राहकांसाठी खास ऑफर(special offer) घेऊन आला आहे. कंपनी ग्राहकांना सोने आणि हिऱ्यांच्या दागिन्यांच्या मेकिंग चार्जेसवर 20 टक्के भरघोस सूट देत आहे. ही ऑफर 2 ते 12 मे पर्यंत असणार आहे.
प्रसिद्ध ज्वेलरी ब्रँड मलबार गोल्ड आपल्या ग्राहकांना अक्षय तृतीयेच्या शुभ मुहूर्तावर सोन्याच्या दागिन्यांच्या मेकिंग चार्जेसवर 25 टक्के सूट देत आहे. कंपनीची ही ऑफर 27 एप्रिल ते 12 मे 2024 पर्यंत असणार आहे. यासोबतच, ब्रँड हिऱ्यांच्या दागिन्यांच्या मेकिंग चार्जेसवर 25 टक्के भरघोस सूटही देत आहे. तर SBI क्रेडिट कार्ड धारकांना 25,000 रुपयांच्या किमान खरेदीवर 5 टक्के कॅशबॅकचा लाभ मिळत आहे. ही ऑफर 1 मे ते 10 मे पर्यंत असणार आहे.
फॅशनेबल ज्वेलरी मॅन्युफॅक्चरिंग ब्रँड मेलोराने हिरे आणि रत्नांच्या दागिन्यांच्या मेकिंग चार्जेसवर 25 टक्के सूट जाहीर केली आहे. अक्षय तृतीयेच्या दिवसापर्यंत तुम्ही या सवलतीचा लाभ घेऊ शकता.
ज्वेलरी ब्रँड Joyalukkasअक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर ग्राहकांना विशेष सवलत देत. कंपनीने खास ऑफर लाँच केली आहे. 50,000 रुपयांपेक्षा जास्त सोन्याच्या खरेदीवर ग्राहकांना 1,000 रुपयांचे गिफ्ट व्हाउचर मिळत आहे. ही ऑफर 3 मे ते 13 मे पर्यंत असणार आहे.
त्याचवेळी, 10,000 रुपयांपेक्षा जास्त किमतीच्या चांदीच्या दागिन्यांच्या खरेदीवर ग्राहकांना 500 रुपयांचे गिफ्ट व्हाउचर मिळत आहे. 50,000 रुपयांपेक्षा जास्त किमतीच्या हिऱ्यांच्या दागिन्यांच्या खरेदीवर, तुम्हाला 2,000 रुपयांचे गिफ्ट व्हाउचर मिळत आहे. ही ऑफर 26 एप्रिल ते 12 मे 2024 पर्यंत असणार आहे.
हेही वाचा :
सुशांत सिंह राजपूत मृत्यूपूर्वी होता त्रस्त, अभिनेत्याचे जुने चॅट व्हायरल
बाळासाहेब आज असते तर धु धु धुतलं असतं; शिंदेंचा ठाकरेंवर शाब्दिक हल्ला
अनेक राज्यांना मिळणार कडक उन्हापासून दिलासा, मुसळधार पावसाची शक्यता