खराब फॉर्ममुळे ड्रेसिंग रूममबाहेर रडला रोहित? Video Viral
सोमवारी वानखेडेच्या मैदानावर मुंबई इंडियन्सने सनरायझर्स हैदराबादचा 7 विकेट्सने(room) पराभव केला. या सामन्यात मुंबईच्या गोलंदाजांनी उत्तम कामगिरी करत सनरायझर्स हैदराबादच्या फलंदाजांना रोखलं. हैदराबादने दिलेल्या लक्ष्याचा पाठलाग करताना मुंबईच्या ओपनर्सची सुरुवात काही फारशी चांगली झाली नाही. मुंबईचा माजी कर्णधार रोहित शर्मा पुन्हा एकदा फेल गेल्याचं दिसून आलं. आऊट झाल्यानंतर रोहित ड्रेसिंग रूमबाहेर रडत असल्याचा व्हिडीओ व्हायरल होतोय.
सनरायझर्स हैदराबादविरूद्धच्या सामन्यात आऊट झाल्यानंतर रोहित शर्मा ड्रेसिंग(room) रुममध्ये बसून खूपच निराश दिसत होता. या स्पर्धेत रोहितला पॅट कमिन्सने अवघ्या 5 चेंडूंमध्ये 4 रन्स करून बाद केलं. सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे.
ज्यामध्ये मुंबई इंडियन्सच्या माजी कर्णधाराच्या चेहऱ्यावर निराशा दिसतोय. इतकंच नाही तर तो डोळे चोळताना देखील दिसला. यामुळे रोहित खराब फॉर्ममुळे रडत असल्याचा अंदाज लावण्यात आला. ( दरम्यान याची पुष्टी झी 24 तास करत नाही ). रोहितने यापूर्वी आयपीएल 2024 मध्ये शतक झळकावलं होतं. परंतु त्या सामन्यात मुंबईला पराभवाचा सामना करावा लागला होता.
येत्या काळात टी-20 वर्ल्डकपला सुरुवात होणार आहे. वर्ल्डकपमध्ये निवडलेले भारतीय खेळाडू आयपीएलमध्ये चांगल्या फॉर्ममध्ये असल्याचं दिसतंय. टीमचा कर्णधार रोहित शर्मानेही आयपीएलच्या या मोसमाची धमाकेदार सुरुवात केली, मात्र गेल्या काही सामन्यांमध्ये त्याची कामगिरी अत्यंत खराब होताना दिसतेय. रोहित आयपीएलमध्ये रन्स काढण्यासाठी संघर्ष करताना दिसतोय. ही टीम इंडियासाठी एक वाईट बातमी आहे. टी-20 वर्ल्डकपपूर्वी रोहित शर्माचे फॉर्ममध्ये येणे खूप महत्त्वाचे आहे.
रोहित शर्माने IPL 2024 च्या पहिल्या 7 सामन्यांमध्ये 49.5 च्या सरासरीने 297 रन्स केले होते. जो या फॉरमॅटमध्ये खूप चांगला आकडा मानला जातो. या काळात त्याचा स्ट्राइक रेटही 164.1 होता. मात्र यानंतर त्याच्या खेळात मोठा बदल पाहायला मिळाला. रोहितने आयपीएलच्या शेवटच्या 5 सामन्यांमध्ये 6.6 च्या सरासरीने रन्स केले होते.
रोहित शर्माने टीम इंडियासाठी आतापर्यंत 151 टी-20 सामने खेळले असून या सामन्यांमध्ये त्याने 31.79 च्या सरासरीने 3974 रन्स केलेत. ज्यामध्ये 29 अर्धशतकं आणि 5 शतकांचा समावेश आहे. T20 वर्ल्डकप 2022 पासून, रोहित शर्माने फक्त 3 टी- 20 सामने खेळले आहेत. या 3 सामन्यात त्याने 121 रन्स केले असून दोन वेळा तो शून्यावर बाद झाला होता.
हेही वाचा :
स्विमिंग पूलमध्ये या अभिनेत्रीच्या दिलखेच अदा….
या कारणामुळे ९व्या क्रमांकावर बॅटिंगसाठी आला ‘थाला’
भारताची पहिली वंदे भारत मेट्रो पाहिली का? असा आहे खास लूक