कोल्हापूर/विशेष प्रतिनिधी
केंद्रीय प्रवेश परीक्षा यंत्रणेच्या वतीने घेतल्या जाणाऱ्या”नीट”परीक्षा (copy) नीटपणे घेतल्या जात नाहीत याचा प्रत्यय पुन्हा आला आहे आणि तो अतिशय गंभीर आहे. मुठभर श्रीमंत विद्यार्थ्यांसाठी नीट चे पेपर फोडले जातात. ते अतिशय नियोजनपूर्वक श्रीमंत विद्यार्थ्यांच्या हातात पोहोचवले जातात, आणि त्याचे सूत्रधार महाराष्ट्रात असतात, शिक्षण महर्षींची फार मोठी समृद्ध परंपरा असलेल्या महाराष्ट्रासाठी हे कमालीचे धक्कादायक आहे. कॉपीची”नीट”फॅक्टरी चालवणाऱ्यांचे खरे आणि भेसूर चेहरे या निमित्ताने पुढे आले आहेत. वैद्यकीय, अभियांत्रिकी आणि तत्सम शिक्षण शाखेत प्रवेश मिळवण्यासाठी केंद्र शासनाच्या शिक्षण मंत्रालयाच्या वतीने”नीट”परीक्षा घेतली जाते. मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात ही परीक्षा घेतली जाणार होती, पण त्यापूर्वीच केमिस्ट्री, फिजिक्स आणि बायोलॉजी या विषयातील पेपर फुटले आणि मग ही नीट ची परीक्षा रद्द करण्यात आली. त्याचा देशभरात सुमारे 26 लाख विद्यार्थ्यांना आणि विद्यार्थिनींना फटका बसला.

या सर्व विद्यार्थ्यांनी परीक्षेची पूर्वतयारी केली होती, (copy) त्यातील अनेक विद्यार्थी डिप्रेशन मध्ये गेले होते आणि काही मुलींनी आत्महत्याही केली आहे. आणि त्याला कारणीभूत नीट चे पेपर फोडणारे संशयित आरोपी आहेत. वास्तविक त्यांच्याविरुद्ध
आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्याचा वेगळा गुन्हा दाखल केला पाहिजे. नीट परीक्षेच्या पूर्वीच पेपर फोडणारे नतदृष्ट हे महाराष्ट्राचे आहेत. त्यांच्याकडून लाखो रुपयांना पेपर विकत घेणारे संबंधित विद्यार्थ्यांचे पालकही तितकेच गुन्हेगार आहेत. त्यानाही या पेपर फुटी गुन्ह्यात सह आरोपी केले पाहिजे आणि तसे केले जाईलही. नीट परीक्षा पेपर फोडणाऱ्या टोळीचे प्रमुख शिवराज मोटेगावकर हे असल्याचे स्पष्ट झाले आहे. सीबीआयने त्यांना अटकही केली आहे. त्यांच्या लातूर, नागपूर, पुणे, कोल्हापूर येथील शाखांवर सीबीआयने धाड टाकली आहे.
दूरदर्शनच्या सर्व वाहिन्यांवर “डॉक्टर, इंजिनीयर बनवणाऱ्या मोटेगावकर (copy) सरांची फॅक्टरी”अशा जाहिराती झळकत होत्या.प्रचंड खर्चाच्या या जाहिराती मोटेगावकर यांना परवडतात कशा अशी प्रश्नांकित चर्चा व्हायची. वास्तविक याच कारणावरून त्यांच्या क्लास कार्यालयावर पोलिसांची नजर जाणे आवश्यक होते. तुम्हाला एवढ्या प्रचंड खर्चाच्या जाहिराती परवडतात कशा आणि हा पैसा तुमच्याकडे कुठून येतो अशी विचारणा केली गेली असती तरी मोटेगावकरांची फॅक्टरी बंद पडली असती.नीट परीक्षेतील विविध विषयांची तयार केली जाणारी प्रश्नपत्रिका आणि मोटेगावकर यांच्या फॅक्टरीत शिकवल्या जाणारा विषय यात कमालीचे साधर्म्य कसे? याचे गूढ आता सीबीआयच्या चौकशीत उघड होईल. विशेष म्हणजे एकूण नीट च्या परीक्षेला बसणाऱ्या विद्यार्थ्यांच्या तुलनेत अगदीच मुठभर श्रीमंत विद्यार्थ्यांसाठी पेपर फुटीचा हा भयानक खेळ खेळला गेला आहे. पेपर फुटीच्या साखळीतील प्रमुख मोटेगावकर आहेत आणि इतर संशयित आरोपी हे उच्च विद्या विभूषित आहेत.
कुणी डॉक्टर आहे, कुणी शासकीय वैद्यकीय अधिकारी आहे,(copy) कुणी फिजिक्स विषय शिकवणारे प्राध्यापक आहेत. यांना खऱ्या अर्थाने व्हाईट कॉलर क्रिमिनल्स म्हणता येईल. समाजात अति प्रतिष्ठित वर्तुळात वावरणाऱ्या या पांढरपेशी गुन्हेगारांचे चेहरे समोर आले असले तरी असे अनेक चेहरे अंधारात आहेत आणि त्यांना उजेडात आणले पाहिजे. गेल्या दहा ते पंधरा वर्षात पेपर फुटीचे अनेक प्रकार घडले आहेत. वेळोवेळी संशयित आरोपींना अटकही केली आहे पण तरीही पेपर फुटीच्या गुन्ह्यात घट होताना दिसत नाही. लक्षावधी रुपयांना पेपर विकत घ्यायचे, आणि मेरिटमध्ये उत्तीर्ण व्हायचे. आणि मग असे विद्यार्थी डॉक्टर इंजिनिअर होणार.त्यांच्याकडून चांगल्या कामाची अपेक्षा कशी करता येईल. शॉर्टकटने डॉक्टर बनलेल्या व्यक्तीकडून योग्य उपचार होतीलच असे नाही किंबहुना चुकीचे उपचार रुग्णाच्या जीवावर बेतू शकतात. तसेच याच मार्गाचा अवलंब करून इंजिनियर बनलेल्या व्यक्तींकडून चांगले बांधकाम होईल याची शक्यताच नाही. याचा अर्थ अशी मंडळी समाजासाठी धोकादायक ठरू शकतात.
सतत प्रश्नपत्रिका फुटतात कशा?, त्याची कारणे काय आणि पेपर (copy)फुटणारच नाहीत अशी व्यवस्था किंवा कठोर उपाय योजना करता येऊ शकतात.त्यापेक्षा राज्य आणि केंद्र शासनाने परीक्षेला उत्तम पर्याय शोधला पाहिजे. नीट परीक्षेसाठी योग्य मार्गदर्शन करणारी यंत्रणा शासनाने उभी केली पाहिजे. खाजगी क्लासेस बंद केले पाहिजेत. लाखो रुपयात शिकवली शुल्क घेताना संबंधित विद्यार्थ्याला किंवा विद्यार्थिनीला हमखास यश मिळाले पाहिजे, तरच आपल्या फॅक्टरीज चालू शकतील. असा विचार करणारे खाजगी शिकवणी वर्ग चालक मग शॉर्टकटचा आधार घेतात. सततच्या पेपर फुटी मुळे परीक्षे वरचा विश्वासच उडेल. आणि मग हे देशाच्या भवितव्यासाठी म्हणून अत्यंत धोकादायक आहे. आता हे धोके बाजूला करण्याचे काम सीबीआयला करावे लागेल.
हेही वाचा
आता 100 रुपयांच्या मालावरही द्यावा लागणार टॅक्स
जास्त पगार असूनही बँक कर्ज देत नाहीये? तर ‘या’ ४ गोष्टींकडे लक्ष द्या
MSRTC कडून एसटी बस दरात मोठी वाढ! प्रत्येक तिकिटावर अतिरिक्त चार्जही लागू