मोठा धक्का! पेट्रोल डिझेलचे दर पुन्हा वाढले, जाणून घ्या लेटेस्ट रेट

देशातील सर्वसामान्यांना महागाईचा आणखी एक मोठा फटका बसला (diesel)असून इंधनाच्या किमती सलग वाढताना दिसत आहेत. शनिवार, २३ मे पासून पेट्रोल आणि डिझेलच्या दरांमध्ये पुन्हा एकदा नव्याने मोठी वाढ लागू करण्यात आली आहे. आंतरराष्ट्रीय पातळीवरील घडामोडींमुळे कच्च्या तेलाच्या पुरवठ्यावर गंभीर परिणाम झाल्याने देशांतर्गत बाजारात या नवीन सुधारित किमती जाहीर करण्यात आल्या आहेत.भारतामध्ये सध्या इंधनाचे जे दर भडकत आहेत, त्यामागे प्रामुख्याने मध्य-पूर्वेतील बिघडलेली परिस्थिती कारणीभूत आहे. अमेरिका आणि इराण या दोन देशांमध्ये कोणत्याही प्रकारचा शांतता करार न होऊ शकल्याने युद्धाचे ढग पुन्हा दाटून आले आहेत. त्यातच होर्मुझची सामुद्रधुनी अद्याप वाहतुकीसाठी खुली न केल्या गेल्यामुळे भारताला होणाऱ्या कच्च्या तेलाच्या पुरवठ्यात मोठा अडथळा निर्माण झाला आहे.

या जागतिक संकटासोबतच, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी भारतावर (diesel) लादलेल्या निर्बंधांमुळे मोठी अडचण उभी राहिली आहे. या निर्णयानुसार भारत आता रशियाकडून कच्च्या तेलाची आयात करू शकत नाही. युद्धाच्या पार्श्वभूमीवर रशियन तेल खरेदीसाठी भारताला दिलेली तात्पुरती सवलतही आता संपली असून तिचे पुढे नूतनीकरण न झाल्यामुळे देशातील इंधनाचा प्रश्न आणि नागरिकांच्या खिशावरील भार अधिकच बिकट झाला आहे.

शनिवार, २३ मे रोजी लागू झालेल्या नव्या दरांनुसार, पेट्रोलमध्ये ९१ पैशांची तर (diesel) डिझेलमध्ये ८६ पैशांची वाढ नोंदवली गेली आहे. यामुळे दिल्ली शहरात आता पेट्रोल ९८.६४ रुपयांवरून थेट ९९.५१ रुपये प्रति लिटरवर पोहोचले आहे. तसेच डिझेल खरेदीसाठी ग्राहकांना ९१.५८ रुपयांच्या जागी आता ९२.४९ रुपये मोजावे लागणार आहेत. याआधी १९ मे रोजी पेट्रोल ८७ आणि डिझेल ९१ पैशांनी महागले होते.विशेष म्हणजे, एप्रिल २०२२ नंतर देशात इंधन दरांमध्ये कोणताही बदल झाला नव्हता, मात्र १५ मे २०२६ रोजी पहिली मोठी दरवाढ करण्यात आली. त्यावेळी पेट्रोलच्या किमतीत ३.१४ रुपयांची उडी पाहायला मिळाली, ज्यामुळे दर ९४.६७ वरून ९७.७७ रुपये प्रति लिटरवर गेले. त्याच दिवशी डिझेलचे दर ३.११ रुपयांनी वाढून ९०.६७ रुपयांवर स्थिरावले होते. त्यानंतर १९ मे रोजी झालेल्या वाढीमुळे हे दर अनुक्रमे ९८.६४ आणि ९१.५८ रुपयांवर पोहोचून आता पुन्हा त्यात भर पडली आहे.

हेही वाचा

शरद पवार भाकरी फिरवणार, 22-23 आमदार संपर्कात? नेमकं काय घडतयं?

पेट्रोलबाबत सरकारचा मोठा निर्णय; जाणून घ्या काय असतील फायदे?

वडिलांच्या समोर कोल्हापुरातील राजाराम बंधाऱ्यावर १२ वर्षीय मुलगा बुडाला