कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ अर्थात गोकुळ दूध संघ यांच्या प्रलंबित निवडणूक प्रक्रियेला आता वेग आला असून संबंधित दूध संस्थांना प्रतिनिधी नियुक्तीचे ठराव दाखल (Kolhapur) करण्यासाठी १ जुलै २०२६ पर्यंत मुदत देण्यात आली आहे.

गोकुळ दूध संघाच्या संचालक मंडळाची निवडणूक प्रक्रिया यापूर्वी विविध कारणांमुळे स्थगित करण्यात आली होती. दरम्यान, सर्किट बेंचने ९० दिवसांच्या आत निवडणुका घेण्याच्या सूचना दिल्यानंतर प्रशासनाने हालचालींना गती दिली आहे. त्यानुसार संलग्न दूध संस्थांच्या सुनावण्या आणि पात्रता तपासणी प्रक्रिया सुरू करण्यात आली होती.पृथ्वीराज चव्हाणांच्या शिलेदारांकडे नजरा; डॉ. मोहितेंच्या निर्णयाने काँग्रेसची अडचण
गोकुळ दूध संघाचा कार्यकाळ संपल्यानंतर तत्कालीन संचालक मंडळाचा पदभार काढून घेण्यात आला होता. (Kolhapur) त्यानंतर शासनाने पाच सदस्यीय प्रशासक मंडळाची नियुक्ती करून संघाचा कारभार प्रशासकीय पद्धतीने सुरू ठेवला आहे.
प्रादेशिक दुग्धव्यवसाय विकास अधिकारी तथा जिल्हा सहकारी निवडणूक अधिकारी, पुणे विभाग यांच्या कार्यालयातून प्रसिद्ध करण्यात आलेल्या आदेशानुसार, संलग्न प्राथमिक दूध संस्थांनी आपल्या प्रतिनिधी नियुक्तीबाबतचे ठराव संबंधित अधिकाऱ्यांकडे सादर करावेत, असे स्पष्ट करण्यात आले आहे.निवडणुकीसाठी मतदार यादी निश्चित करण्याची प्रक्रिया सुरू असून पात्र संस्थांचा अंतिम सहभाग निश्चित झाल्यानंतर पुढील निवडणूक कार्यक्रम जाहीर होण्याची शक्यता आहे. (Kolhapur) त्यामुळे गोकुळच्या राजकारणात पुन्हा एकदा हालचालींना वेग आला असून विविध गटांनी मोर्चेबांधणी सुरू केली आहे.
हेही वाचा
डोनाल्ड ट्रम्पच्या मुलीवर प्राणघातक हल्ल्याचा प्रयत्न