व्हाट्सअप हे सध्याच्या काळात सर्वाधिक वापरला जाणारा मेसेजिंग ॲप आहे. अगदी शाळेत जाणाऱ्या मुलांपासून ऑफिसला जाण्याच्या लोकांपर्यंत सर्वजण व्हाट्सअपचा वापर करतात. व्हाट्सअपवर(WhatsApp) त्यांच्या युजरसाठी अनेक नवीन फीचर्स उपलब्ध आहेत. त्या फीचर्सद्वारे युजर्सचा अनुभव सतत बदलत असतो. व्हाट्सअप मेसेजिंग, कॉल्स आणि स्टेटसमध्ये सतत नवीन फीचर्स जोडले जात आहेत. आता देखील कंपनी त्यांची युजरसाठी एक नवं आणि अनोखा फीचर घेऊन आली आहे. हे फीचर व्हाट्सअप कॉलिंगसाठी आहे. आता युजर्सचा व्हाट्सअप कॉलिंगमधील अनुभव पूर्णपणे बदलणार आहे.

व्हाट्सअप ग्रुपमधील कॉल पहिल्यापेक्षा अधिक सोपा, इंटरॲक्टिव आणि ऑर्गनाइज बनवण्यासाठी कंपनी एक नवीन फीचर घेऊन आली आहे. या फीचरमध्ये कॉल शेड्युलिंग, इंटरव्हेटिव टूल्स आणि कॉल लिंक सारख्या सुधारणांचा समावेश आहे. यामुळे युजर्स आधीच कॉल प्लॅन करू शकणार आहेत आणि त्यांची इतर कामं मॅनेज करू शकतील. ज्यामुळे जेव्हा कॉल करायचा असेल तेव्हा युजर वेळ काढून ग्रुपमधील इतर लोकांशी संवाद साधू शकतील आणि त्यांना यावेळी कोणत्याही प्रकारचा व्यत्यय येणार नाही.

शेड्युलिंग, इंटरॅक्टिव्ह टूल्स आणि कॉल लिंक अपडेट हे सर्व फीचर्स जगभरातील व्हाट्सअप युजर्ससाठी हळूहळू रोल आउट केले जात आहेत. हे नवं फीचर लाँच करण्याचा उद्देश असा आहे की कॅज्युअल ग्रुप चॅट, ग्रुप कॉल, प्रोफेशनल मीटिंग ह्या सर्व गोष्टी आणखी मजेदार आणि प्रॉडक्टिव्ह व्हाव्यात,कॉल शेड्युल करण्यासाठी तुम्हाला काही स्टेप्स फॉलो करावे लागणार आहेत, सगळ्यात आधी व्हाट्सअप ओपन करा आणि कॉल टॅब्समधून कॉल शेड्युल करा.

कॉल टॅबमधील प्लस बटणावर क्लिक करा आणि कॉल शेड्युल सिलेक्ट करा.तुम्हाला तारीख आणि वेळ टाकण्याचा ऑप्शन दिसेल तुमच्या हिशोबाने इथे तारीख आणि वेळ निवडा. आता ग्रुपमधील लोकांना इन्व्हाईट करण्यासाठी कॉलची लिंक ग्रुपवर शेअर करातुम्ही शेड्युल केलेले कॉल हे कॉल टॅबमध्ये दिसतील ज्यामध्ये अटेंडी लिस्ट आणि कॅलेंडरमध्ये ऍड करण्याचा ऑप्शन दिसेल. कॉल सुरू होण्यापूर्वी सहभागी होणाऱ्या सर्व युजर्सना एक नोटिफिकेशन पाठवले जाईल ज्यामुळे कॉल मिस होण्याची शक्यता कमी होणार आहे

तुम्ही शेड्युल केलेले सर्व कॉल्स एकाच ठिकाणी कॉल टॅब मध्ये दिसणार आहेत. ही कॉलिंग लिंक तुम्ही ग्रुप वरती किंवा इतर लोकांची शेअर करू शकता. फॅमिली गेट टुगेदर किंवा ऑफिस मीटिंगसाठी हे फीचर अत्यंत फायदेशीर ठरणार आहे. तसेच कंपनीने व्हाट्सअप (WhatsApp)कॉलिंगमध्ये हॅन्ड रेस आणि रिएक्शन्स देखील जोडल्या आहेत. ज्यामुळे आता कॉलिंग आणखी मजेदार होणार आहे. जर समोरचा व्यक्ती बोलत असेल आणि तुम्हाला तुमचे मत मांडायचे असेल तर तुम्ही हॅन्ड रेस चा वापर करू शकता.

हेही वाचा :

पंतप्रधान मोदींची शेतकऱ्यांना मोठी भेट, 2 हजार 481 कोटींच्या….

निवडणूक रंगणार “बेस्ट” ठरणार “लिटमस पेपर टेस्ट”

ऑफीस लॅपटॉपमध्ये WhatsApp Web चा वापर करताय, थांबा!

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *