लाईव्ह सामन्यात शाहरुख खानकडून मोठी चूक! मागावी लागली माफी

कोलकाता नाईट रायडर्स संघाने क्वालिफायर १ च्या सामन्यात(match)सनरायझर्स हैदराबाद संघाला पराभूत करत फायनलचं तिकीट मिळवलं आहे. श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखाली खेळणारा कोलकाता नाईट रायडर्सचा संघ या हंगामातील फायनलमध्ये पोहचणारा पहिलाच संघ ठरला आहे.

या सामन्यात(match) कोलकाता नाईट रायडर्स संघाला चिअर करण्यासाठी संघमालक शाहरुख खाननेही हजेरी लावली होती. कोलकाताच्या विजयानंतर शाहरुख खान जल्लोष साजरा करताना दिसून आला. दरम्यान सामन्यानंतर त्याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होऊ लागला आहे.

अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर झालेल्या सामन्यात सनरायझर्स हैदराबाद संघाने प्रथम फलंदाजी करताना १५९ धावा केल्या. कोलकाता नाईट रायडर्स संघाला फायनलमध्ये जाण्याासाठी १६० धावांची गरज होती. हे आव्हान कोलकाता नाईट रायडर्सने १३.४ षटकात पूर्ण केलं. या विजयानंतर शाहरुख खानने सामना पाहण्यासाठी आलेल्या क्रिकेट चाहत्यांचे आभार मानले.

शाहरुख खानने चाहत्यांचे आभार मानत असताना स्टेडियमची प्रदक्षिणा घातली. यादरम्यान त्याच्याकडून एक मोठी चूक झाली. ज्यावेळी खान कुटुंब फॅन्सचे आभार मानत होते, त्यावेळी चुकुन ते लाईव्ह शो मध्ये गेले. ज्यावेळी त्याला याची जाणीव झाली, त्यावेळी त्याने आकाश चोप्रा, पार्थिव पटेल आणि सुरेश रैनाची माफी मागितली. त्यानंतर शाहरुख खाने तिन्ही समालोचकांना मिठी मारली आणि कान पकडून माफी मागण्याचा इशाराही केला. हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतोय.

क्वालिफायर १ च्या सामन्यात कोलकाता नाईट रायडर्स संघाने ७ गडी राखून विजय मिळवत फायनलचं तिकीट मिळवलं. एलिमिनेटरचा सामना राजस्थान रॉयल्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु या दोन्ही संघांमध्ये होणार आहे. या सामन्यातील विजेता संघ क्वालिफायर २ च्या सामन्यात सनरायझर्स हैदराबादचा सामना करेल. या सामन्यात विजय मिळवणारा संघ फायनलमध्ये कोलकाता नाईट रायडर्स संघाविरुद्ध खेळताना दिसेल.

हेही वाचा :

नागरिकांना दिलासा! सोन्याच्या किंमती घसरल्या

नागरिकांना दिलासा! सोन्याच्या किंमती घसरल्या

निर्यातबंदी हटवल्यानंतर 45 हजार टन कांद्याची निर्यात