कोल्हापुरात कारवर कोसळलं भलं मोठं झाड, कारचा झाला चुराडा
कोल्हापूर जिल्ह्याला मान्सूनपूर्व पावसाने चांगलंच झोडपून काढलं आहे. (car)आज दुपारी जिल्ह्यातील विविध गावांमध्ये सोसाट्याचा वारा, विजांच्या गडगडाटासह पावसाने हजेरी लावली.कोल्हापूर जिल्ह्याला मान्सूनपूर्व पावसाने चांगलंच झोडपून काढलं आहे. आज दुपारी जिल्ह्यातील विविध गावांमध्ये सोसाट्याचा वारा, विजांच्या गडगडाटासह पावसाने हजेरी लावली.
जिल्ह्यातील अनेक गावांमध्ये मुसळधार पाऊस झालेला आहे.जोतिबा डोंगरावर देखील विजांच्या कडकडाटासह वादळी पाऊस झालाय. अनेक ठिकाणी घरांवरील पत्रे उडाले तर रस्त्यावर झाडं (car)कोसळली आहेत. जोतिबा रोडवरील हॉटेल साम्राज्य इथं चारचाकीवर भलमोठं झाड कोसळलं असून कारचा अक्षरश: चुराडा झाला आहे. कारमधील दोघं दोघजण जखमी झाले आहेत.
छत्रपती संभाजीनगर शहरासह जिल्ह्यातील ग्रामीण भागात वादळी वारे आणि विजेच्या कडकडाटासह पावसाने जोरदार तडाखा दिलाय. करमाड, शेकटा आणि करंजगाव शिवारात झालेल्या पावसामुळे शेतकऱ्यांची चांगलीच धावपळ उडाली. तर बिडकिन शिवारात झालेल्या पावसाचा फटका शेतकऱ्यांच्या पपई च्या बागाना बसला असून हे पीके आडवी झाली आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झालंय.
शिवाय उन्हाळी पिकांना देखील याचा मोठा फटाका बसलाय. दरम्यान अचानक आलेल्या या पावसामुळे शेतकऱ्यांची चांगलीच तारांबळ उडाली. या अवकाळी पावसामुळेमुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडल्याने लवकरात लवकर पंचनामे करून नुकसान भरपाई देण्याची मागणी शेतकरी वर्गातून होत आहे.(car) ढगाळ वातावरणामुळे उन्हाचा चटका कमी अधिक होत असतानाच उकाडा मात्र कायम आहे. दरम्यान मराठवाड्यात वादळी वाऱ्यासह पावसाचा इशारा हवामान विभागाने वर्तवलाय.
हेही वाचा :.
केजरीवाल यांना जीवे मारण्याची धमकी
Covaxin च्या दुष्परिणामांबाबतचे आरोप खोटे? समोर आले नवे अपडेट