केजरीवाल यांना जीवे मारण्याची धमकी

दिल्लीचे मुख्यमंत्री आणि आम आदमी पार्टीचे राष्ट्रीय संयोजक अरविंद केजरीवाल (threat)यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. ‘आप’ने दिल्ली मेट्रोतील फोटो शेअर केले असून केजरीवाल यांचा जीव धोक्यात असल्याचे म्हटले आहे. भारतीय जनता पक्ष केजरीवाल यांच्यावर जीवघेणा हल्ल्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप आप नेते आणि राज्यसभा खासदार संजय सिंह यांनी केला आहे.

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना खुलेआम जीवे मारण्याची धमकी दिली जात आहे. पीएमओ, भाजप आणि नरेंद्र मोदींच्या इशाऱ्याने राजीव चौक, पटेल नगर मेट्रो स्थानकावर धमकीचा संदेश लिहिण्यात आला आहे.(threat) केजरीवाल यांच्या जीवाचे काही बरेवाईट झाल्यास याला भाजप आणि नरेंद्र मोदी जबाबदार असतील, असा इशारा ‘आप’ने दिला आहे

आप’चे खासदार संजय सिंह यांनी सोमवारी सकाळी पत्रकार परिषद घेत केजरीवाल (threat)यांच्या जीवाला धोका असल्याची माहिती दिली. केजरीवाल तुरुंगातून बाहेर आल्यापासून भाजप सैरभैर झाली आहे. भाजप केजरीवाल यांच्यावर जीवघेणा हल्ल्याचे षडयंत्र रचत आहे. हे सगळे षडयंत्र पीएमओ कार्यालयातून रचले जात आहे. राजीव चौक आणि पटेल नगर मेट्रो स्थानकावर केजरीवाल यांच्याविरोधात धमकीचे संदेश लिहिण्यात आले आहेत, असा आरोप संजय सिंह यांनी केला.

भाजपच्या मनामध्ये अरविंद केजरीवाल यांच्याबाबत द्वेष आहे. या द्वेषातून ते काहीही करू शकतात. केजरीवाल यांच्या जीवाला काहीही झाले तर त्याला भाजप आणि पीएमओ कार्यालय जबाबदार असेल. केजरीवाल तुरुंगात असतानाही 23 दिवस त्यांना इन्सुलिन देण्यात आले नव्हते, असेही संजय सिंह म्हणाले.

हेही वाचा :

दहशतवादी हल्ल्यामध्ये भाजप नेत्याची हत्या…

मोठी बातमी! EVM मशिनला हार घातला, नावाच्या चिठ्ठ्या वाटल्या; शांतीगिरी महाराजांसह ४ कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल

‘रावण पण हिंदुत्ववादी’, मतदानाच्या दिवशी राज ठाकरेंवर खूप बोचरी टीका