Covaxin च्या दुष्परिणामांबाबतचे आरोप खोटे? समोर आले नवे अपडेट
कोवॅक्सिनच्या(covaxin) दुष्परिणामांवर नुकतेच BHU मध्ये संशोधन झाले आहे. हे संशोधन एका परदेशी जर्नलमध्ये प्रसिद्ध झाले आहे. यानंतर, Covaxin च्या दुष्परिणामांबद्दल मीडियामध्ये अनेक अहवाल आले आहेत. एका नवीन अभ्यासात असा दावा करण्यात आला आहे की, कोवॅक्सिन लस देण्यात आलेल्या 30 टक्के लोकांना काही प्रकारचे दुष्परिणाम जाणवले आहेत. यानंतर इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च अर्थात ICMR ने या संशोधनावर तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.
ICMR महासंचालक डॉ राजीव बहल यांनी अभ्यासाचे लेखक आणि जर्नलच्या(covaxin) संपादकांना पत्र पाठवले आहे. त्यात त्यांनी हे संशोधन पूर्णपणे दिशाभूल करणारे आणि चुकीच्या तथ्यांवर आधारित असल्याचे लिहिले आहे. याचा ICMR शी काही संबंध नाही. यासाठी तांत्रिक किंवा आर्थिक सहाय्य दिलेले नाही, असे ICMR ने म्हटले आहे. एवढेच नाही तर त्यांनी आयसीएमआरचे नाव काढून टाकण्यास सांगितले आहे.
ICMR च्या महासंचालकांनी प्रोफेसर शंखसुभ्र चक्रवर्ती, जेरियाट्रिक मेडिसिन विभागाचे अध्यक्ष आणि डॉ. उपिंदर कौर यांना नोटीस बजावून त्यांना या प्रकरणी उत्तर देण्यास सांगितले आहे. याची प्रत आयएमएस बीएचयूचे संचालक प्रोफेसर एसएन शंखवार यांनाही देण्यात आली आहे. असे सांगण्यात आले आहे की प्राध्यापक चक्रवर्ती यांनी त्यांच्या संशोधनाच्या प्रकाशनासाठी ICMR कडून आर्थिक आणि तांत्रिक सहाय्य केले आहे.
या महिन्याच्या सुरुवातीला कोवॅक्सिनच्या दुष्परिणामांबाबत BHU संशोधकांचा अहवाल समोर आला होता. लस घेतलेल्या काही लोकांमध्ये दुष्परिणाम दिसून आले. या संशोधनात सुमारे 1024 लोकांचा समावेश करण्यात आला होता. त्यात 635 किशोर वयीन आणि 391 प्रौढ होते. या सर्वांना लसीकरणानंतर एक वर्षानंतर फॉलो-अप तपासणीसाठी संपर्क करण्यात आला.
अभ्यासात असे आढळून आले की, 304 किशोरवयीन म्हणजे सुमारे 48 टक्के व्हायरल अप्पर रेस्पीरेटरी ट्रॅक्ट इन्फेक्शन आढळून आले आहे. अशीच परिस्थिती तरुणांमध्येही दिसून आली. याशिवाय, 10.5 टक्के किशोरवयीन मुलांमध्ये न्यू-ऑनसेट स्किन एंड सबकुटेनियस डिसऑर्डर यासारख्या समस्या दिसून आल्या.
"Poor methodology," ICMR dissociates itself from Covaxin safety study, calls for retraction
— ANI Digital (@ani_digital) May 20, 2024
Read @ANI Story | https://t.co/5MWKtL5xvc#ICMR #Covaxin pic.twitter.com/JN0GwK6KGV
10.2 टक्के लोकांमध्ये सामान्य विकार दिसून आले. न्यूरोलॉजिकल डिसऑर्डर संबंधित समस्या ४.७ टक्के आढळल्या. त्याचप्रमाणे, 8.9 टक्के तरुणांमध्ये सामान्य समस्या, मस्कुलोस्केलेटल विकार म्हणजेच स्नायू, मज्जातंतू, सांधे यांच्याशी संबंधित समस्या 5.8 टक्के आणि मस्कुलोस्केलेटलशी संबंधित समस्या 5.5 टक्के आढळल्या.
हेही वाचा :.
‘रावण पण हिंदुत्ववादी’, मतदानाच्या दिवशी राज ठाकरेंवर खूप बोचरी टीका
मोठी बातमी! बारावीच्या निकालाची तारीख ठरली, बोर्डाने दिली महत्वाची अपडेट