पुणे : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे(political leader) (अजित पवार गट) शहराध्यक्ष दीपक मानकर यांच्यासह शंतनु सॅम्युअल कुकडे, रौनक जैन यांच्यासह काही जणांविरोधात फसवणूक केल्याप्रकणी गुन्हा दाखल झाला आहे. बनावट दस्त सादर करून आर्थिक व्यवहार कायदेशीर असल्याचे भासवण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी हा गुन्हा नोंदवला आहे. याप्रकरणी समर्थ पोलीस ठाण्यात वरिष्ठ निरीक्षक उमेश गित्ते यांनी तक्रार दिली. त्यानूसार भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम ३३६ (२), ३३८, ३४० (२), ३(५) नुसार गुन्हा नोंद केला आहे.

पोलीस शंतनू कुकडेवर दाखल असलेल्या लैंगिक अत्याचाऱ्याच्या गुन्ह्यांचा तपास करत आहेत. कुकडे ‘रेड हाऊस फाउंडेशन’ नावाची संस्था चालवितात. त्याने या संस्थेच्या माध्यमातून मोठ्या आर्थिक उलाढाली केल्याचे दिसून आले. पोलिसांनी या व्यवहारांबाबत माहिती घेतली. तेव्हा संस्थेच्या आर्थिक व्यवहारात कुकडे, जैन व मानकर यांच्यातील व्यवहार समोर आला.
कुकडेच्या संस्थेच्या बँक खात्यातून ७ सप्टेंबर २०२४ ते २९ ऑक्टोबर २०२४ या काळात मानकर यांच्या बँक(political leader) खात्यावर १ कोटी १८ लाख रुपये ट्रान्सफर झाले. या व्यवहाराच्या चौकशीत मानकर यांनी ‘हा आर्थिक व्यवहार आगळंबे (ता. हवेली) येथील जमीन विक्रीतून झाला आहे, असे सांगितले होते. तर जैन याच्याशी ५ कोटी ५१ लाख रुपयांचा करार झाल्याचे सांगत त्याची विसारपावती पोलिसांना सादर केली.
मात्र, संबंधित कागदपत्रे बनावट असल्याचे पोलीस तपासात दिसून आले. मानकर, जैन, कुकडे व इतर साथीदारांनी संगनमत करून फसवणूक केली. त्यांनी आर्थिक व्यवहार लपवण्यासाठी आणि तो कायदेशीर दाखवण्यासाठी बनावट दस्त तयार करून ते खरे असल्याचे भासवण्याचा प्रयत्न केला समोर आले.
दीपक मानकर यांनी दिलेली विसारपावती ५०० रुपयांच्या स्टॅम्प पेपरवर होती. मात्र, तो स्टॅम्प बनावट असल्याचे समोर आले. स्टॅम्प पेपरचा क्रमांक ‘CZ272346’ हा होता. प्रत्यक्षात तो स्टॅम्प पेपर पुणे कोषागार कार्यालयात ७ जानेवारी २०२५ रोजी प्राप्त झाला व २२ जानेवारी २०२५ रोजी शंकर गंगाराम आठल्ये या अधिकृत मुद्रांक विक्रेत्याला वितरित झाला. मात्र, मानकर यांनी त्याच क्रमांकाचा स्टॅम्प पेपर २७ ऑगस्ट २०२४ रोजी वापरल्याचे दाखवले, असे समोर आले. तेव्हा मानकर यांनी दिलेला दस्त बनावट असून, तो खोटा दस्त म्हणून वापरल्याचे स्पष्ट झाले, असे पोलीस तक्रारीत नमूद आहे.

स्टॅम्प पेपरचा प्रकार समोर आल्यानंतर पोलिसांनी रौनक जैनकडे विचारणा केली(political leader). त्यावेळी ‘दीपक मानकर यांनी मला त्यांच्या घरी बोलावून त्या स्टॅम्प पेपरवर सही करण्यास सांगितले. त्यामुळे मी सही केली,’ असे जैनने कबुल केल्याचे समर्थ पोलिसांनी म्हंटले आहे. जैनची कबुली व अधिकृत रजिस्टर, सह दुय्यम निबंधक कार्यालयातील नोंदी याआधारे मानकर यांनी सादर केलेला दस्त पूर्णतः बनावट असल्याचे निष्पन्न झाले, असे वरिष्ठ निरीक्षक उमेश गित्ते यांनी म्हटले आहे.
हेही वाचा :
आता मुलांच्या शिक्षणाचे टेन्शन सोडाच! पोस्ट ऑफिसची लहान मुलांसाठी जबरदस्त योजना
धाकधूक वाढली! थोड्याच वेळात दहावीचा निकाल, ‘येथे’ करा चेक
आज अनेक शुभ योग ‘या’ 4 राशींवर असेल देवी लक्ष्मीची कृपा! धनलाभाचे संकेत