आजकाल चुकीची जीवनशैली आणि अयोग्य आहारा यामुळे अनेक (women)आजार मागे लागतात. यामध्ये महिलांचाही समावेश होते. अशातच अंडाशय म्हणजे ओव्हरीमध्ये गाठ सिस्ट होणं सामान्य गोष्ट मानली जाते. ही समस्या २० ते ४० वयोगटातील महिलांमध्ये ही समस्या अधिक प्रमाणात दिसून येते.महिलांच्या ओव्हरमध्ये बनणारी ही गाठ जीवघेणी नसते. मात्र यामुळे वेदना, अनियमित पिरीयड्स, गर्भधारणेत समस्या या तक्रारी उद्भवू शकतात. आज आपण या आर्टिकलच्या माध्यमातून जाणून घेऊया तुमच्या कोणत्या छोट्या छोट्या चुकामुळे ओव्हरीमध्ये सिस्ट निर्माण होऊ शकतात.

अनहेल्दी डाएट
आजकाल अनेक महिलांचा आहार चुकीचा असतो. जास्त तळलेले, जंक फूड, गोड पदार्थ आणि प्रक्रिया केलेले पदार्थ खाल्ल्याने शरीरातील हार्मोनल संतुलन बिघडतं.(women)यामुळे ओव्हरीमध्ये सिस्ट तयार होण्याची शक्यता वाढते.
मासिक पाळीकडे दुर्लक्ष
जर मासिक पाळी वेळेवर येत नसेल, जास्त वेदना होत असतील, रक्तस्त्राव होत असेल किंवा अनियमितता असेल तर त्याकडे दुर्लक्ष करू नका. ही लक्षणे पीसीओएस किंवा ओव्हरी सिस्टमची असू शकतात.
वजन
जास्त वजन किंवा लठ्ठपणामुळे देखील हार्मोनल असंतुलन होतं. परिणामी ज्यामुळे सिस्ट तयार होण्याची शक्यता वाढते. वजन नियंत्रणात ठेवणे खूप महत्वाचे आहे.
व्यायाम न करणं
फीट राहण्यासाठी व्यायाम हा महत्त्वाचा असतोच. यावेळी शरीर एक्टिव्ह न राहणं, (women)दिवसभर बसून काम करणं किंवा अजिबात व्यायाम न करणं यामुळे शरीराच्या चयापचय आणि हार्मोन्सवर परिणाम होतो. ज्यामुळे ओव्हरीमध्ये सिस्ट होण्याचा धोका लक्षणीयरीत्या वाढतो.
पुरेशी झोप घेणं
कामाच्या वाढत्या ताणामुळे रात्री अनेकांचं जागरण होतं. अशावेळी झोपेच्या कमतरतेमुळे शरीरात ताण वाढतो आणि हार्मोन्समध्ये व्यत्यय येतो. जे अंडाशयातील सिस्टचे एक प्रमुख कारण आहे. त्यामुळे दररोज किमान ७-८ तास झोप घेणं महत्वाचं आहे.
हेही वाचा :
रात्रीच्या वेळी चुकूनही करू नका ही 4 कामे, आयुष्यावर होईल वाईट परिणाम
निक्की-अरबाज झाले इंटिमेट, फोटोशूटमध्ये ओलांडल्या रोमान्सच्या सगळ्या मर्यादा
‘मी तिच्यासमोर नग्न…’ वहिनी श्रीदेवीसोबत ते सीन करताना अनिल कपूर यांची झाली वाईट अवस्था